क्राइम

सोलापूर पोलिसांकडून चोरीचे वाहन व मोबाईल विकणाऱ्या टोळीस अटक

शहर गुन्हे शाखेने चोरीच्या ३ गुन्ह्यातील १ ऑटो रिक्षा, १ मोटार सायकल व २३ मोबाईल हँडसेट जप्त केले

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सोलापूर पोलिसांकडून चोरीचे वाहन व मोबाईल विकणाऱ्या टोळीस अटक

शहर गुन्हे शाखेने चोरीच्या ३ गुन्ह्यातील १ ऑटो रिक्षा, १ मोटार सायकल व २३ मोबाईल हँडसेट जप्त केले

पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर शहरात अनेक दिवसापासून चोरीचे वाहन व मोबाईल हँडसेट विक्री करणाऱ्या टोळीच्या मागावर नजर ठेवत गुन्हे शाखेकडे पोलीस पथकाने २ आरोपींकडून चोरीची रिक्षा दुचाकी तसेच 23 मोबाईल हॅन्डसेट जप्त करत एकुण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर शहरामधील मालमत्तेविषयक चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस आयुक्त एम. राज कुमार,पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोउपनि मुकेश गायकवाड यांनी प्राप्त गोपनिय बातमी बाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, यांना सविस्तर माहिती दिली असता त्यांचे सूचनेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये दि. २३/९/२०२५ रोजी पोउपनि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना, “एक इसम चोरीची ऑटो रिक्षा विक्री करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या पाठीमागील जाणारा सार्वजनिक रस्त्याचे कडेला थांबला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली.” त्या बातमीप्रमाणे इसम नामे सैफन नुरुदीन वागवान वय ३० वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार- ४१० किसान नगर, अंबाबाई मंदिरा जवळ चौगुले यांचे घरात भाडयाने, सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडुन एक काळ्या रंगाची बजाज ऑटो कंपनीची रिक्षा त्याचा आर.टि.ओ. क्र. एम एच १३/सीटी ५७३६, एक काळया रंगाची होंडा यूनिकॉर्न कंपनीची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल १५ हजार रुपये
असे ताब्यात घेतले यापैकी जेलरोड पोलीस ठाणे गु. र. क्र. ४८७/२०२५ भा. न्या. सं. क. ३०३(२), तसेच वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गु. र. क्र. ३७८/२०२५ भा.न्या.सं. क. ३०३ (२) अन्वये दाखल असलेले २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दरम्यान दि. २८/९/२०२५ रोजी पोउपनि मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना एक संशयीत इसम नामे लखन तुकाराम बेरुणगी वय ३८ वर्षे, राहणार- १०३७७/२७ राहुल गांधी झोपडपट्टी, दाजी पेठ, सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळुन आला. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीचे २३ स्मार्ट मोबाईल फोन मिळुन आले. नमुद मोबाईलच्या IMEI नंबरची पडताळणी केली असता, त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं. ६५६/२०२५ भा. न्या. सं. क. ३०३ (२) या गुन्हयातील असल्याचे दिसुन आले. त्याचप्रमाणे उर्वरीत २२ मोबाईल हँडसेट यांचे IMEI नंबरची पडताळणी करुन मोबाईल धारकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

अशाप्रकारे शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यातील १ ऑटो रिक्षा,१ मोटार सायकल व २३ मोबाईल हैंडसेट जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस आणूण एकुण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), राजन माने सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, पोउपनि. मुकेश गायकवाड व त्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक बाळु काळे, सतिश काटे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close