क्राइम

पंढरपूर शहरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या २ चोराकडुन पाच मोटार सायकली जप्त

गणपती विसर्जना दिवशी चार मोटरसायकलची झाली होती चोरी;चोर सांगली, सोलापूर जिल्ह्यातील

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर शहरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या २ चोराकडुन पाच मोटार सायकली जप्त

गणपती विसर्जना दिवशी चार मोटरसायकलची झाली होती चोरी;चोर सांगली, सोलापूर जिल्ह्यातील

पंढरपूर(प्रतिनिधी):- गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहराच्या विविध भागातून दुचाकी मोटरसायकलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची घटना घडत होती दरम्यान गणपती विसर्जना दिवशी पंढरपूर शहरातून चार मोटरसायकलची चोरी झाल्याने पोलिसांनी वेगाने तपास करत सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी पाच मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर शहरामधुन गणेश विसर्जना दिवशी दोन मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या त्याचा मागोवा घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपासा करीता सांगली येथे गेले होते. तेथे गोपनिय माहिती मिळाली की आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला, वय २९ वर्षे, रा. जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली,व उध्दव प्रताप मिले, वय ५५ वर्षे, रा. तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी माहे फेब्रुवारी व सप्टेंबर मध्ये एकुण ४ मोटार सायकली चोरल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर आरोपीस काल ताब्यात घेवून विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील एकुण ४ गुन्हयाची कबुली दिल्याने दाखल नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोह सिरमा गोडसे, पोह विठ्ठल विभुते, पोह प्रसाद औटी, पोह सचिन हेंबाडे, पोका कपिल माने, पोशि शहाजी मंडले, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.

चोरीच्या मोटरसायकली मध्ये फेरबदर करून पुन्हा जुन्या बाजारात मोटरसायकली विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून पोलिसांनी आता मोटरसायकल चोरावर आपली करडी नजर ठेवल्याने मोटरसायकल चोरांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close