क्राइम

सोलापूर पोलीसांकडून आंतरराज्यीय प्रोफाईल कार चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश

आलिशान चोरीच्या कारची चेसी, इंजिन नंबर बदलून करत होते विक्री

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सोलापूर पोलीसांकडून आंतरराज्यीय प्रोफाईल कार चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश

आलिशान चोरीच्या कारची चेसी, इंजिन नंबर बदलून करत होते विक्री

दिल्लीतील ५ गुन्हे उघड, ५ चोरीचे अलीशान कारसह एकुण ८३ लाख ८० हजार रू. किमतीचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर(प्रतिनिधी):- देशाची राजधानी असलेल्या दिल्ली राज्यातून आलिशान पाच कारची चोरी करून महाराष्ट्रात आणून त्याची चीसी व इंजिन नंबर बदलून चोरीच्या गाडीची विक्री करण्याचे काम अट्टल गुन्हेगाराकडून होत असल्याची माहिती पोलिसांना समजल्याने सोलापूर शहरात तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी असे गुन्हे उघड करण्यासाठी मोहीम आखली आणि याच मोहिमेत दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यात गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चोरीच्या पाच आलिशान गाड्यासह ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयामध्ये वाहन चोरी करणारे आरोपींचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून चाहन चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे मुळेगाव तांडा येथे सोलापूर ते हैद्राबाद जाणारे रस्त्यावर, इंडीयन ऑईल पंपाच्या समोर सर्विस रोडच्या शेजारी एक पांढरे रंगाची टोयटा कंपनीची फॉरच्यूनर वाहन उभे असल्याचे दिसले. सदर वाहनाचा संशय आल्याने सपोनि पाटील हे पथकासह त्या पांढरे रंगाची फॉरच्युनर वाहना जवळ गेले. सदर वाहन क्रमांक एम.एच. ४५ /ए.डब्ल्यू ५५७७ या वाहनामध्ये एकूण चार इसम दिसून आले. त्यांचेकडे वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून कागदपत्रे नसल्याबाबत सांगितले. सदर वाहन व वाहनातील इसमांबाबत शंका आल्याने सपोनि पाटील यांनी सदर वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनाचे चेसी नंबर व इंजिन नंबर प्रिंट असणारी प‌ट्टी काढली असल्याचे दिसले. व त्याठिकाणी चेसी व इंजिन पट्टी घासून त्यावर नवीन चेसी व इंजिन क्रमांक प्रींट केला असल्याचे दिसून आल्याने सपोनि पाटील यांनी सदर वाहनास लावलेले आरटीओ. कमांक एम.एच.४५/ए.डब्ल्यू ५५७७ ची माहिती घेतली असता सदरचे वाहन नंबरचे मालक यांनी आपले वाहन ताब्यात असल्याचे सांगितले.

दरम्यान सपोनि पाटील यांनी वाहन व वाहनातील इसमानां ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे अजीम सलीमखान पठाण वय-३६ वर्षे रा. महाराष्ट्र बैंक शेजारी रहिमतपुर, ता. कोरेगाव जि. सातारा, प्रमोद सुनिल वायदंडे वय २६ वर्षे रा. घामनेर स्टेशन, रहिमतपुर, ता. कोरेगाव, जि. सातारा,फिरोज शिराज मोहम्मद वय ३५ वर्षे रा. आर टी नगर, डी मार्ट जवळ, बेंगलोर राज्य कर्नाटक,इरशाद सफिउल्ल सयद वय-३४ वर्षे रा. मुलब्बागल, कोलार राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले.

संशय वाढल्याने इसमांकडे अधिक कसुन तपास केला असता वरील सर्व आरोपी हे विमानाने दिल्ली येथे जावुन तेथील इसम हफिन रा. मेरठ दिल्ली, व लखविंदर सिंग रा. रायपुर यांचेकडुन चोरीचे वाहन महाराष्ट्रात आणुन त्यांची मुळ इंजिन व चेसी नंबर पट्टी काढून त्याठिकाणी चोरीच्या कारच्या मॉडेल प्रमाणे बनावट इंजिन व चेसी नंबर बसवुन बनावट आरटीओ रजिस्टर स्मार्ट कार्ड तयार करून महाराष्ट्रत विक्री करत असल्याचे सांगितले. सदर आरोपी यांचेकडे अधिक तपास करून त्यांचे ताब्यातुन १ टोयोटा कंपनीची फॉरच्युनर कार, ३ हयुंडाई कंपनीच्या क्रेटा कार, १ मारुती सुझुकी कंपनीची ब्रिजा कार असे एकुण ५ अलीशान कार व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ८३ लाख ८० हजार रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याबाबत सदर इसमांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरुनं ४९९/२०२५, बीएमएस-२०२३ चे कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर पोलिसांनी दिल्ली येथील ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर गुन्हयाचा तपास सपोनि पाटील ने. स्था. गु. शाखा सोलापूर ग्रामीण हे करीत आहे. नमुद आरोपी यांनी आणखीन महाराष्ट्रात असे किती चोरीची वाहने बनावट चेसी व इंजिन नंबर तयार करून विक्री केली आहे त्याचा तपास करत आहेत.

नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन यांचे गुन्हे अभिलेख पाहता आरोपी नामे अजीम सलीम पठाण व हफिज रा. मेरठ राज्य दिल्ली याचे वर महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पिंपरी चिंचवड येथे २ तर मुखर्जीनगर, हरीनगर, मोर्या, राणीबाग, शाकरपूर, बिसरस, मॉडेल टाऊन, सुभाष प्लेस पोलीस ठाणे राज्य दिल्ली येथे ८ तर शिवपुरी पो.स्टे. राज्य मध्यप्रदेश येथे १ आणि आरसीकेअर पो.स्टे. राज्य कनार्टक येथे १ असे १२ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, सपोफी निलकंठ जाधवर, पोहेकों सलीम बागवान, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, मपोहेकों पल्लवी इंगळे, पोकों सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, यश देवकते, समर्थ गाजरे, बाळराजे घाडगे, चापोकों दिलीप थोरात व पोहवा व्यंकटेश मोरे, सायबर पोलीस ठाणे यांनी बजावली. आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत त्यांच्याकडून पाच आलीशान गाड्या जप्त केल्याने सोलापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close