राज्यात रासप सर्व जागा स्वबळावर लढवणार – राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर
शिरभावी जिल्हा परिषदेचे तिकीट कार्यकर्ते अनिल शेंडगे यांना जाहीर

संपादक – दिनेश खंडेलवाल
राज्यात रासप सर्व जागा स्वबळावर लढवणार – राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर
शिरभावी जिल्हा परिषदेचे तिकीट कार्यकर्ते अनिल शेंडगे यांना जाहीर
पंढरपूर(प्रतिनिधी):- राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची मोठी घोषणा केली. सर्वसामान्य जनतेचा पक्ष म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत असेही ते म्हणाले.
“सामान्य माणूसच खरी ताकद असतो” हे पुन्हा एकदा सिद्ध करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील कार्यकर्त्यांच्या मागणीवरून जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. उपस्थित कार्यकर्त्यातून मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या वेळी बोलताना महादेव जानकर पुढे म्हणाले की “शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत मिळाली पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे. ओबीसी आरक्षणावरून चाललेली फूट थांबवण्यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन धनगर व इतर मागासवर्गीयांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्यावेत. महाराष्ट्राचं वातावरण दूषित झालंय ते बदलायचं असेल तर तात्काळ निर्णय करून गावगाडा एकसंघ ठेवला पाहिजे.”
दरम्यान त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अडचणींचाही उल्लेख करत सांगितले की
ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी सरकारने माफ करावी. शिक्षणाचा बोजा कुटुंबांवर पडू देऊ नये.
यावेळी रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, बार्शी तालुका अध्यक्ष किशोर गाडेकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल दादा शेंडगे, उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, सोशल मीडिया प्रमुख डि.के. पाटील, शिरभावी तंटामुक्त उपाध्यक्ष विक्रम होवाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ढोले युवा नेते बाजीराव सलगर, समाधान सलगर, अण्णासो मेटकरी, बापू मस्के, सचिन होवाळ, गणेश शेंडगे, जगजीतसिंह शेंडगे, प्रणव शेंडगे,पार्थ विक्रम होवाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.