
संपादक – दिनेश खंडेलवाल
आवताडे शुगरचे ऊस उत्पादकांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आ. आवताडे
दिपावली साठी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून भेट
पंढरपूर(प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला अवताडे शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी सहकार्य करून आमच्यावर विश्वास दाखवत ऊस कारखान्याला घातल्यामुळे तीन हंगाम यशस्वी पार पडले असून यामध्ये कामगारांचा वाहतूकदारांचा सिंहाचा वाटा आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देणार असून यापुढेही शेतकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी असेच सहकार्य करावे शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दरही देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
वाढीव ऊस उताऱ्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.लि. नंदूर या साखर कारखान्याचा चौथा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आमदार आवताडे यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.
यापुढील काळात सुद्धा आपल्या सर्वांच्या साथीने आवताडे शुगर आपली उत्कृष्ट वाटचाल कायम ठेवील असेही आमदार अवताडे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी अनिल यादव, कारखान्याचे सरव्यवस्थापक सुधीर पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनीही आपली मनोगते मांडली.
यावेळी कारखाना कार्यस्थळावर हंगाम २०२५-२६ बॉयलर प्रदिपन समारंभासाठी मागील तीन वर्षात जास्त ऊस घातलेले शेतकरी शितल सागर खबाले,अमृता विठ्ठल पवार, कमल दत्तात्रय गायकवाड, तेजश्री सुनिल शेणवे, संगीता शंभु माळी, अर्चना सारंग जाधव, पिंकाबाई दादा जानकर, कुसुम निवृत्ती चव्हाण, कल्पना निवृत्ती बंडगर, संगीता प्रकाश कोरे, सारिका तानाजी भोसले या ११ शेतकऱ्यांच्या हस्ते जोडीने सत्यनारायण व होमहवन पूजा करण्यात आली.
यावेळी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला आटकळे, मार्केट कमिटी माजी सभापती सोमनाथ आवताडे, माजी जि.प सदस्य बापुराया चौगुले, माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ, माजी उपनगर अध्यक्ष चंद्रकांत पडवळे, माजी प.स.सदस्य नितीन पाटील, दामाजीचे संचालक गौडाप्पा बिराजदार, दामाजी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, माजी संचालक सुरेश भाकरे, रमेश भांजे, राजीव बाबर, विजय माने, राजन पाटील, बापूराव काकेकर, संजय पवार, भारत निकम, बसवेश्वर पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, विठ्ठलचे माजी संचालक दुर्योधन हाक्के, मारापुरचे सरपंच विनायक यादव, धनंजय पाटील, जनार्धन शिवशरण, तुकाराम कुरे, प्रशांत जगताप, अॅड. डीसी जाधव, कैलास चळेकर, गणेश गावकरे, गंगाधर काकनगी, धनाजी बिचुकले, आकाश डांगे, आवताडे स्पिनर्सचे युनिट हेड सुनील कमते, वर्क्स मॅनेजर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट सुनील पाटील, डिस्टीलरी मॅनेजर संभाजी फाळके, चिफ अकौटट बजरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, एचआर मॅनेजर डी. बी. बळवंतराव, इडीपी मॅनेजर निलेश रणदिवे, असि सुरक्षा अधिकारी रणजीत पवार तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी, खातेप्रमुख आणि शेतकरी तसेच कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.