पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक
मिरवणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी धरला लेझीमवर ठेका

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक
मिरवणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी धरला लेझीमवर ठेका
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक येथील भीमशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंढरपुरात निघालेल्या मिरवणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सहभाग घेत लेझीम हाती घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद देत लेझीमवर ठेका धरला. यावेळी भीमशक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड भीम गीतावर जोरदार लेझीमचे सादरीकरण केले. याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिली.
बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजेच विजयादशमी दिवशी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीमा अनुयायी हा सण विजयादशमी दिवशी साजरा करतात.
भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्मांच चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त पंढरपुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी मंडळाचे चेअरमन संतोष सर्वगोड,अध्यक्ष लखन सर्वगोड ,समाजसेवक बाबा चव्हाण सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.