शिक्षकांचा कौल कौस्तुभ गावडे यांनाच ते विधान परिषदेत जाणार!
पुणे विभागात विजयाची चर्चा, आमदार होणारच!

संपादक – दिनेश खंडेलवाल
शिक्षकांचा कौल कौस्तुभ गावडे यांनाच ते विधान परिषदेत जाणार!
पुणे विभागात विजयाची चर्चा, आमदार होणारच!
पंढरपूर :- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा निकाल अवघ्या काही तासा नंतर लागणार आहे, पण त्याआधीच शिक्षकांनी आपला कौल स्पष्ट केला आहे. कौस्तुभ गावडे यांनाच शिक्षकांचा कौल असल्याने ते विधान परिषदेत जाणार आणि शिक्षक मतदार संघाचे आमदार होणारच त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार. अशी प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून उमटू लागले आहे.
सध्या पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूरमध्ये शिक्षकांच्या गाठीभेटी, बैठका आणि स्टाफरूममध्ये एकच चर्चा रंगली आहे. यावेळी बदल हवाय आणि तो बदल म्हणजे शिक्षक मतदार संघात कौस्तुभ गावडे यांच्या रुपाने होणार त्यामुळे शिक्षक मतदार संघाचं नेतृत्व तेच करणार असल्याचे सांगितले जाते.
का आहे गावडेंना पसंती?….
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर कौस्तुभ गावडे यांची ठाम भूमिका, जुनी पेन्शनसाठी आक्रमक पाठपुरावा, शिक्षकांना शिक्षकेतर कामातून मुक्त करण्याची ग्वाही, भाजपच्या ताकदीमुळे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले – “आम्ही अनेकांना संधी दिली, पण आमचे प्रश्न आजपर्यंत तसेच राहिले आहे. कौस्तुभ गावडे हे तरुण, तडफदार आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आहे. म्हणूनच आम्ही ठरवलंय यावेळी कौस्तुभ गावडेंनाच विधान परिषदेत पाठवायचं!”
विजयाची चर्चा अन् गुलाल तयार!….
प्रचारात मिळणारा प्रचंड प्रतिसाद, शिक्षक संघटनांचा वाढता पाठिंबा आणि भाजप कार्यकर्त्यांची फौज पाहता कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अनेक ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी गुलालही आणून ठेवला आहे. गुलाल आमचाच असे बोलले जाते.
[ अवघ्या काही तासात निकाल लागणार असला तरी शिक्षक वर्गात सध्या एकच चर्चा – कौस्तुभ गावडे यांचा विजय पक्का आणि ते विधान परिषदेत जाणार यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने ते विजयी होणार आहेत!]


