आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन
वृद्ध माता पित्यांना विराजभैय्या आवताडे यांच्या हस्ते मिष्टान्न भोजन वाटप
संपादक-दिनेश खंडेलवाल
आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन
वृद्ध माता पित्यांना विराजभैय्या आवताडे यांच्या हस्ते मिष्टान्न भोजन वाटप
पंढरपूर : “अन्न हे पूर्णब्रह्म” पौष्टिक व सकस आहाराने शरीरास पोषक तत्व मिळतात याची जाणीव ठेवून पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त आमदार समाधान दादा आवताडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद (भैया) कळसे यांनी मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील वृद्ध माता – पित्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
अन्न पूर्ण ब्रम्ह या पवित्र परंपरेला साजेशे कार्य करण्यासाठी आमदारपुत्र तथा युवक नेते विराजभैय्या आवताडे यांच्या हस्ते मिष्ठान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
विराज भैय्या आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांच्या पलीकडे मानवतेची वीण घट्ट करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान दादा आवताडे यांच्या व्यक्तिमत्व कृतीचा आदर केला जातो.
लहान मुलांना शाळेमध्ये वह्या वाटपापासून ते वृद्धांच्या मिष्ठान्न भोजनापर्यंतचे विविध कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसून येत होता.
आपल्या मतदारसंघातील आबाल पासून वृद्धापर्यंत प्रत्येक गोष्टीची जाणीव असल्याने त्या त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतानाच सोलापूर जिल्ह्यामध्ये रुग्णांना कमी पडणार्या रक्ताचा पुरवठा लक्षात घेऊन मतदारसंघातील दोन्ही तालुक्याच्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
वृद्धाश्रमातील मिष्ठान्न भोजनाच्या कार्यक्रम प्रसंगी महेश दादा चव्हाण,माऊली गांडुळे,उमेश सर्वगोड, अजित लेंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.