महाआरोग्य शिबिरात १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांची झाली तपासणी
आरोग्य विभागाचा नवीन विश्वविक्रम;उत्कृष्ट नियोजनामुळे ठरली यशस्वी आरोग्य वारी

संपादक-दिनेश खंडेलवाल
महाआरोग्य शिबिरात १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांची झाली तपासणी
आरोग्य विभागाचा नवीन विश्वविक्रम;उत्कृष्ट नियोजनामुळे ठरली यशस्वी आरोग्य वारी
पंढरपूर :- महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदा आषाढी यात्रेत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात द्वादशीपर्यंत १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांची विश्वविक्रम करत आरोग्य तपासणी झाली आहे. त्यामुळे यंदा आरोग्य विभागाने नवीन जागतिक विक्रम नोंदवताना आपलाच मागील आषाढी वारीचा रुग्ण तपासणीचा विक्रम मोडला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली.
प्रा. शिवाजी सावंत म्हणाले की पंढरपूरमध्ये गोपाळपूर रोड, ६५ एकर मैदान, तीन रस्ता चौक आणि वाखरी पालखी तळ अशा चार ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ, तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १७ जुलै या चारही दिवस आरोग्य शिबिराला वारकरी, भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले.
तर ६५ एकर येथील शिबिरात सर्वाधिक वारकरी भाविकांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात आले. शिवाय तीन रस्ता, गोपाळपूर येथील आरोग्य शिबिरात सर्व रोगांवर तपासणी औषधोपचार केला जात आहे. नवमीपर्यंत ८ लाख २९ हजार तर द्वादशी अखेर १० लाख ७५ हजार वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. द्वादशी अखेर सर्व चार शिबिरामध्ये मिळून १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदा रुग्ण तपासणीचा नवीन विश्वविक्रम झाला आहे असेही प्रा. शिवाजी सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, नर्सेस स्टाफ कर्मचारी यांनी सर्वांचे योग्य विचारपूस करत शिबिर यशस्वी केल्याने तसेच विश्वविक्रम होत असल्याने सर्वांचे अभिनंदन केले.
मागील वर्षी महाआरोग्य शिबिराचे पहिलेच वर्ष होते. गेल्यावर्षी भाविकांच्या गर्दीच्या तुलनेने कमी रुग्ण असल्याने महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांची तपासणी सुद्धा कमी झाली होती. मागील वर्षी १९ लाख ६५ हजार वारकऱ्यांची तपासणी झाली होती आणि याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. हा विश्वविक्रम मोडीत काढून यंदा १४ लाख २८ हजार १२० रुग्णांची तपासणी करून विश्वविक्रम केला असल्याचे बोलले जाते. ]