ईतरसामाजिक

पंढरीत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी केली रुग्ण वारकऱ्यांची विचारपूस

पंढरीत दुसर्यावर्षी आरोग्य शिबिराचे चार ठिकाणीं आयोजन;आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे विशेष लक्ष

संपादक-दिनेश खंडेलवाल 

पंढरीत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी केली रुग्ण वारकऱ्यांची विचारपूस

पंढरीत दुसर्यावर्षी आरोग्य शिबिराचे चार ठिकाणीं आयोजन;आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे विशेष लक्ष

महा आरोग्य शिबिरात जाऊन घेतली रुग्णांची भेट

पंढरपूर/ दिनेश खंडेलवाल:- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची सर्वात मोठी भरणारे आषाढी यात्रा ही १७ जुलै रोजी संपन्न होत असून यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात यंदा दुसऱ्या वर्षीही महत्त्वाच्या चार ठिकाणी “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” हे ब्रीदवाक्य घेऊन लाखो वारकऱ्यांना आरोग्याची अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पंढरी नगरीत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याची पाहणी मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यासह आमदार समाधान आवताडे मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांना भेटून विचारपूस करून पाहणी केली.

आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते १८ जुलै २०२४ दरम्यान “महाआरोग्य शिबीर” “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” वारी काळात सुमारे १५ लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आज पंढरपूर येथे आरोग्य विभागाची या महाआरोग्य शिबीर व महाराष्ट्र भरातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसंदर्भात, नियोजन व इतर तयारी संदर्भात आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व संबंधित अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांना सूचना दिल्या. व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्या ठिकाणी आरोग्य शिबीर होणार आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

या महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या ४ ठिकाणी भव्य दिव्य मंडप उभारण्यात आले असून जवळपास पाच हजार डॉक्टरांच्या मदतीने सर्व वारकऱ्यांची सेवा,आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच यावेळी जवळपास दोनशे डॉक्टर डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार असून या माध्यमातून किमान पाच लाख वारकऱ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.

थंडी, ताप, खोकला, पोटदुखी आधी तत्सम आजारावरचे सर्व औषधे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांना दिले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सहाशे दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना देखील महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, जवळपास शंभर तपासण्या करण्याची सोय मोफत उपलब्ध करण्यात आली आहे.

हे महाआरोग्य शिबीर राबवण्यासाठी सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव, अहमदनगर या पाच जिल्ह्यातून सर्व आरोग्य यंत्रणाचे कर्मचारी याठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

[ अत्यावश्यक असणाऱ्या सर्व उपचारा बरोबरच औषधाची ही व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी ॲम्बुलन्स बरोबरच टू व्हीलर मोबाईल ॲम्बुलन्स ची व्यवस्था आहे. त्यामुळे तातडीने उपचार मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ]

[ या आरोग्य तपासणी मध्ये काही वारकऱ्यांना जर आवश्यकता वाटली तर त्या वारकऱ्यांना मोफत शस्त्रक्रिया करून द्यायची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा पातळीवरील दर्जेदार रुग्णालयात मोफत करून देण्यात येणार आहे. ]

[ प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य ]

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close