स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत पाटील यांना जाहीर पाठिंबा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने पाठिंबा
संपादक – दिनेश खंडेलवाल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत पाटील यांना जाहीर पाठिंबा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने पाठिंबा
पंढरपूर(प्रतिनिधी):- २४५ माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत आबा पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत उसाला उच्चांकी दर दिला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील विशेषता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी आज माढा मतदारसंघातील उमेदवार अभिजीत आबा पाटील यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला.
माढा स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठिंबा आज सकाळी भीमानगर येथे स्वाभिमानाची बैठक झाली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा काटा व उच्चांकी दर देण्याचे तीन वर्षे झाली काम करत असलेले अभिजीत आबा पाटील यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय झाला आहे.
यावेळी स्वाभिमानीचे नेते विठ्ठलचे संचालक सचिन पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ पाटील, युवा नेते प्रशांत पाटील, अजिनाथ पराबत, प्रताप पिसाळ, सत्यवान गायकवाड, अतकर सर, विष्णु कुंभार,आबा कुंभार तसेच संजय बाबा कोकाटे, नितीन बापू कापसे, बाळासाहेब पाटील यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.