अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.राजेश फडे यांची नियुक्ती
लंम्पी रोग मुक्त गो साठी नियोजन करणार- फडे
संपादक-दिनेश खंडेलवाल
इंदोर(प्रतिनिधी):- ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा तसेच गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे रा. पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी डॉ.राजेश फडे यांना भगवा दुपट्टा घालत अहिंसा गो सेना परिवाराची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यकाळात अनेक यश संपादन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लवकरच लंम्पी रोग होऊ नये यासाठी आलेले व्हॅक्सीन देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया नूतन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेश फडे यांनी बोलताना व्यक्त केली.