पंढरीत जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्त कॅन्डल मार्च व समुदेशन
एचआयव्ही संसर्गित रुग्णांना "भेदभाव न करणे" बाबत दिली शपथ

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्त कॅन्डल मार्च व समुदेशन
एचआयव्ही संसर्गित रुग्णांना “भेदभाव न करणे” बाबत दिली शपथ
पंढरपूर : एच आय व्ही बाधीतांना कायदेविषयक संबधीत सेवा देणे बाबत सर्वोपतोपरी प्रयत्न करु तसेच समाजातील सर्व घटकांनी एच. आय. व्ही. संसर्गितासोबत कोणताही भेदभाव न करता त्यांनी माणुसकीची वागणूक द्यावी अशी प्रतिक्रिया पंढरपूर विभागाचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केली. दरम्यान अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले.
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर अंतर्गत आय.सी.टी.सी व एआरटी सेंटर, यांचे सहयोगाने पंढरपूर येथील नवीन बसस्थानक येथे जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त एचआयव्ही संसर्गित रुग्ण जे मृत्युमुखी झाले त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करणेसाठी व नवीन एचआयव्ही संक्रमण रोखण्याचा संकल्प करण्याकरिता कॅन्डल मार्च चे आयोजन केले होते.
याप्रसंगी मोठ्याप्रमाणात रेडरेबीनचे बोधचिन्ह फुलांच्या पाकळ्यांच्या सहाय्याने व २०२२ या वर्षाचे घोष वाक्य Equalize” – (आपली एकता, आपली समानता, HIV सह जगणाऱ्यांकरिता) असे रांगोळीतून साकारले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेशकुमार माने, पंढरपूर बसस्थानक वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सदस्य शंकर आण्णा ऐतवाडकर, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, तालुका संघटक महेश भोसले, उजिरू पंढरपूरचे बालरोग तज्ञ डॉ. प्रदीप केचे, एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सयाजीराव गायकवाड, उजिरु पं. प्रशासकीय अधिकारी टी. के. गोहाड, मेट्रन मॅडम श्रीम. सिंधूताई लवटे, यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून व रेडरेबीन बोधचिन्हाच्या भोवती मेणबत्ती प्रज्वलीत केल्या व एचआयव्ही बाबतचा समाजातील कलंक व भेदभाव दुर होण्याकरिता व नवीन संक्रमण होऊ दयावयाचा नाही अशी शपथ देण्यात आली.
प्रारंभी कार्यक्रमाची प्रस्तावना एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आय. सी. टी., एआरटी केंद्र यांचे माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा सादर करून पंढरपूर एआरटी सेंटरच्या माध्यमातून संसर्गितांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, सीडी ४ चाचणी, व्हायरल चाचणी आदी महागडया चाचण्या मोफत केल्या जातात. यापुढेही असेच एचआयव्ही संक्रमणाबाबत समाजात जनजागृती करण्यात येईल व या वर्षीच्या घोष वाक्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांची एच. आय. व्ही. चाचणी करून घेणे ही सामायिक जबाबदारी आहे. व मोफत शासकीय विविध योजना व सवलतीची माहिती दिली.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेशकुमार माने यांनी उपजिल्हा रग्णालया मार्फत संसर्गितांना कोणताही भेदभाव न करता उपलब्ध चाचणी व औषधोपचार तसेच संसर्गित गरोदर मातांना प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर मोफत सेवा दिल्या जात असतात. अशी माहिती दिली.
आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांचे मार्फत लाड यांनी दुर्धर संसर्गित रुग्णांना मोफत एस.टी. प्रवास सेवा बाबत कोणतीही अडचण येणार नाही यांची ग्वाही दिली. याप्रसंगी अ.भा.ग्रा.पं.चे जिल्हा सदस्य शंकर आण्णा ऐतवाडकर, बालरोग तज्ञ डॉ. प्रदीप केचे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी वैद्यकिय अधिकारी, डॉ. अविनाश वुईके, डॉ. विनिता कार्यकर्ते, अधिपरिचारीका, श्रीम. लतिका उराडे, एम. एम. कुलकर्णी, प्रतिभा कदम, अनुराधा जाधव, औषधनिर्माता जयप्रकाश पवार, महेश जाधव, विहान प्रकल्पचे समन्वयक संतोष शेंडगे, व इतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समुपदेशक पुरुषोत्तम कदम व आभार प्रदर्शन बाजीराव नामदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता युवराज वांगी, संदीप देशमुख, दिपक गोरे, नागेश देवकर, श्रीम. मिनाक्षी चोळ्ळे, रुपाली देवकर, सुज्ञाता गायकवाड, वैशाली सोलापूरे, योगिराज विजापूरे, एजाज बागवान, बाळासाहेब पांढरे, सुरेखा साठे, तुकाराम साठे, भारत सोनवणे, राजश्री टकले यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाची सांगता संसर्गित रुग्णांना “भेदभाव न करणे” बाबत शपथ देऊन करण्यात आली.