राज्य

पंढरपूर नगरपरिषदेने ८ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना दिल्या अनुकंपा खाली नियुक्त्या

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी घेतला अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा निर्णय

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर नगरपरिषदेने ८ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना दिल्या अनुकंपा खाली नियुक्त्या

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी घेतला अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा निर्णय

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगर परिषदेमध्ये ८ कर्मचारी सेवेत असताना मयत झाले होते. या मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा खाली नियुक्ती मिळावी म्हणून सन २०१६ पासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व संघर्ष समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती व याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेशी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने चर्चा झाली होती. यावर शासनाने राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दहा हजार अनुकंपा धारकांची नियुक्ती करण्याचा अतिशय सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील शासकीय कार्यालय, नगरपालिका, महानगरपालिका मधील सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा खाली नियुक्ती द्यावी म्हणून आदेश दिले होते. त्यानुसार पंढरपूर नगर परिषदेमधील सेवेत असताना मयत झालेल्या ८ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा खाली नियुक्ती मिळावी म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक व मुख्याधिकारी महेश रोकडे यांना पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यावर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्याधिकारी यांना शासनाच्या निर्णयानुसार अनुकंपाच्या नियुक्ती देण्याबाबत सांगितले होते.

दरम्यान पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी त्वरित अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला व अनुकंपाधारक वैशाली बारसकर, विश्वनाथ मिसाळ, विनायक जाधव, ऋषिकेश देशपांडे, राहुल लोखंडे, अजय ढवळे, समर्थ शेंडगे, वैभव शिंदे या ८ अनुकंपाधारकांना मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या शुभहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, जनसंपर्क अधिकारी सुवर्णा हाके नगर अभियंता प्रकाश केसकर व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अँड सुनील वाळूजकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, उपाध्यक्ष जयंत पवार, नागनाथ तोडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close