अंगणवाडी पी १ मध्ये पोषण पखवडा कार्यक्रम संपन्न
पालकांना सकस व पोष्टीक आहाराचे महत्त्व सांगण्यात आले.
संपादक-दिनेश खंडेलवाल
अंगणवाडी पी १ मध्ये पोषण पखवडा कार्यक्रम संपन्न
पालकांना सकस व पोष्टीक आहाराचे महत्त्व सांगण्यात आले
पंढरपूर : पंढरपूर शहरातील मातंग समाज मंदिर येथील अंगणवाडी क्रमांक पी १ मध्ये पोषण पखवाडा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित पालकांना सकस व पौष्टिक आहाराचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाग र्भवती माता यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प पंढरपूर नागरी बीट क्रमांक एक अंतर्गत अंगणवाडी क्रमांक पी/१ मातंग समाज मंदिर येथे सीडीपीओ सौ. वर्षा पाटील मॅडम व मुख्यसेविका सौ. सवीता जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पोषण पखवडा हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी पालकांना भरड धान्य, कडधान्य व तृणधान्ये यापासून पदार्थ बनवून सकस व पोष्टीक आहाराचे महत्त्व आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहे हे सांगण्यात आले. यावेळी महीला पालकांकडून सकस व पौष्टिक पदार्थ बनवून त्यांची पाककला स्पर्धा घेण्यात आली. हिरव्या रंगाचे फळ व पालेभाज्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. या बाबत अंगणवाडी सेविका आशाताई कांबळे यांनी महत्त्व सांगितले.
कार्येक्रमासाठी अंगणवाडी सेविका श्रीमती आशाताई कांबळे,आलका रावळ, मनिषा क्षीरसागर, रेश्मा गाडे, निशा ढवळे व मदतनीस जस्मिन मुजावर, सुनिता देवमारे,रेखा कदम, व लक्ष्मी ओव्हाळ,सरोजिनी कासेगावकर यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात गर्भवती माता,स्तनदा माता, पालक, किशोरी मुली, लहान बालके आदी उपस्थित होते. पालकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.