ज्यांनी प्रेमाने वाढवलं सहकार्य केलं त्यांच्याशीच गद्दारी झाली – खा. धैर्यशील मोहिते पाटील
या मतदारसंघातील जनता बदल घडवल्या शिवाय थांबणार नाही

संपादक – दिनेश खंडेलवाल
ज्यांनी प्रेमाने वाढवलं सहकार्य केलं त्यांच्याशीच गद्दारी झाली – खा. धैर्यशील मोहिते पाटील
या मतदारसंघातील जनता बदल घडवल्या शिवाय थांबणार नाही
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत यांच्या प्रचाराच्या शुभारंभ माचनूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उमेदवार अनिल दादा सावंत, राहुल शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, सुधीर भोसले, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे, श्याम गोगाव यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्याने अनिल सावंत यांनी काळजी करू नये, हा मतदारसंघ शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघ असून या ठिकाणची जनता मोठ्या मताधिक्याने तुम्हाला विजयी करेल. दिनांक २७ रोजी राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला कशी गेली? याचा विचार करून मोठा धक्का बसला, शरद पवार साहेब तुम्हाला उमेदवारी देणार होते. तुम्हाला बोलवण्यात आले होते. ए बी फाॅर्म देण्याचे ही सांगण्यात आले. २८ तारखेला वाट पाहिली, तरीही तुम्ही गेला नाही, तुम्हाला साहेबांनी प्रेमाने वाढवलं सहकार्य केलं, तरीही तुम्ही साहेबांशी गद्दारी केली. यादरम्यान कोणी गडबड केली काय केली हे लवकरच सांगणार आहे. शरद पवार सारख्या बुजुर्ग माणसाला फसवण्याचे काम ज्यांनी केलं त्यांना याच निवडणुकीत अद्दल घडवण्याचं काम येथील जनता केल्याशिवाय राहणार नाही.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता शरद पवारांवर किती प्रेम करते हे आम्ही जवळून पाहिलेले आहे २००९ च्या निवडणुकीत आम्ही ते अनुभवले असल्याचेही यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा सहकारावर उभा राहिलेला जिल्हा असून या जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था जपल्या होत्या. या संस्था वैयक्तिक नसून शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत हे आताची काही लोक विसरू लागले आहेत. या जिल्ह्यातील कारखाने अडचणीत आल्यावर शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून शरद पवारांनी नेहमी सहकार्य केले आहे. शरद पवारांच्या पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये साहेबांना साथ दिली पाहिजे हा आदेश विजयसिंह मोहिते पाटलांनी दिला होता. यानंतरच आम्ही साहेबांना साथ दिली येथील जनता साहेबांना साथ देणार आहे. देत आहे. अनिल सावंत यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली ती फक्त त्यांच्या दाखवलेल्या संयम तसेच राष्ट्रवादीच्या एकनिष्ठते मुळे त्यांचा विजय निश्चित होणार अशी ग्वाही यावेळी धैर्यशीर मोहिते पाटील यांनी दिली.