ईतर

मतदार संघातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार माझ्यावर विश्वास ठेवा – अनिल सावंत

अनिल दादा सावंत यांनी निवडणूक लढवावी मतदार संघातील महिलांसह युवक व मतदारांचा आग्रह

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मतदार संघातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार माझ्यावर विश्वास ठेवा – अनिल सावंत

अनिल दादा सावंत यांनी निवडणूक लढवावी मतदार संघातील महिलांसह युवक व मतदारांचा आग्रह

पंढरपूर(प्रतिनिधी):- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये तुतारी हातात घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अनिल दादा सावंत यांची सध्या मतदारसंघातील गाव भेट दौरे सुरू आहेत. गाव भेट दौऱ्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी, अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी महिलांसह युवक तरुणांचा मतदारांचा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आग्रह आहे आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली असून मतदार संघातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आपला विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याची ग्वाही अनिल दादा सावंत यांनी मतदारांना दिली.

पंढरपूर तालुक्यातील गिदेगांव, इसबावी भागात गावभेट दौऱ्यात अनिल सावंत यांनी तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

आजपर्यंत कोणत्या लोकप्रतिनिधीने मतदारसंघासाठी, नागरिकांसाठी काय केले हे सांगत टीका करत बसण्यापेक्षा मी मतदारसंघासाठी काय करू शकतो‌ तसेच मतदारसंघासाठी भविष्यातील व्हिजन काय असणार आहे यावरच माझा भर राहणार आहे. कोणावर टीका टिप्पणी करणे हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्यामुळे याआधी मी सामाजिक जाणिवेतून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना माझ्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही मतदारसंघातील जनतेसाठी माझी काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे माझ्यावर फक्त विश्वास ठेवा मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नच शिल्लक ठेवणार नाही असेही भैरवनाथ शुगरचे व्हा चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे गावभेट प्रसंगी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केलेल्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार केला. त्यांच्याशी चर्चा करताना तेथे अनेक समस्या असल्याचे लक्षात आले. लवकरात लवकर जितक्या शक्य होतील तितक्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पंढरपूर तालुक्यातील इसबावी या गावाला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांचे प्रश्न, अडचणी जाणून घेतल्या. समाजाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती करायची असेल तर महिलांचा प्रत्येक क्षेत्रात सहभाग असने गरजेचे आहे. येणाऱ्या काळात महिलांसाठी प्रामुख्याने काम करणार असल्याचा शब्दही यावेळी बोलताना दिला.

[ या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत अनेक आश्वासने देऊन निवडणुका लढवल्या गेल्या निवडून आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा बरोबरच इतर विकास कामांनाही प्राधान्य देऊन आपण मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू आपणा सर्वांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. आपला आशीर्वाद लाभणार अशी खात्री आहे.
अनिल दादा सावंत….]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close