विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले तिथे सर्वसामान्य जनतेचे काय – अनिल सावंत
एक विश्वासू,हक्काचा माणूस म्हणून आपले मतदान रुपी आशीर्वाद द्या कोर्टीच्या सभेत आवाहन

संपादक – दिनेश खंडेलवाल
विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले तिथे सर्वसामान्य जनतेचे काय – अनिल सावंत
एक विश्वासू,हक्काचा माणूस म्हणून आपले मतदान रुपी आशीर्वाद द्या कोर्टीच्या सभेत आवाहन
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात
गतवेळी दोन वर्ष दोन्ही ठिकाणी पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या मतदारसंघांमध्ये गांव बैठक घेऊन प्रचार केला आणि निवडणुकी पुरती आश्वासने दिल्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना जनतेनी मतदान केले. पण त्यांनी काय केले. जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झालाय का नाही हे माझ्यापेक्षा आपल्या लोकांना तसेच तुमच्यासारख्या तरुण पिढीला समोर बसलेल्या मातांना भगिनींना चांगलं माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची कोर्टी या गावांमध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलत होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की ज्याप्रमाणे त्यांनी पक्षातील लोकांना,कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जसे वऱ्यावरती सोडले आहे. पण एवढेच सांगतो की मी तुम्हाला वाऱ्यावरती कधीही सोडणार नाही. आपले सहकारी मत मागतायत फक्त आणि फक्त वडिलांची कृपा आशीर्वादामुळे जनता तुम्हाला फिरकू देत आहे. जो व्यक्ती दोन दोन तीन वर्ष दोन दोन महिने तीन-चार महिन्यात या मतदार संघामध्ये ज्यांचे काम नाही अशा व्यक्ती वरती कोण विश्वास ठेवणार पण आपण एक सहकारी पक्षाचे लोक आहोत. येणाऱ्या काळामध्ये त्याची मदत आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काय काम नाही. या सर्वांचा विचार करता नेते मंडळींनी साहेबांकडे माझी उमेदवारी मागितली असता त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली असून शेवटी जनतेचे व या भागातील लोकांचे साहेबांच्या वरती प्रेम बघता हा विजय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा असून मला मतदान म्हणजे शरद पवार साहेबांना मतदान महाविकास आघाडीला मतदान विकासाला मतदान आहे.
त्यामुळे एक विश्वासू माणूस, एक हक्काचा माणूस म्हणून आपण मतदान करावं आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला संधी द्यावी. या भागात गेली पंधरा वर्षे झाले साखर कारखाना चालवतो माझ्यापासून मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये सर्व शेतकरी तसेच जनतेचा चांगला सहवास असून आपले प्रश्न सोडवण्यासाठी माझे घर पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यात साखर कारखाना असल्याने सर्वांना कधीही मी उपलब्ध होणार आहे.
येणाऱ्या काळात मतदारसंघांमध्ये चांगले हॉस्पिटल्स,शाळा कॉलेजेस,बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कंपन्या, रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणी, शहरांमध्ये असलेल्या गटारांची असुविधा या सर्व समस्यांवरती काम करण्याची एक संधी मला द्या त्या संधीचे सोने करून दाखवीन. त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हा समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या व तुमच्या लोकसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन मतदारांना केले.
यावेळी कोर्टी गावातील तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.