राजकिय

येणाऱ्या प्रत्येक निवडणूका ताकदीने लढवणार – अनिल दादा सावंत

राष्ट्रवादीच्या आत्मचिंतन बैठकीत अनिल सावंत यांनी घेतली पराभवाची जबाबदारी

संपादक – दिनेश खंडेलवाल

येणाऱ्या प्रत्येक निवडणूका ताकदीने लढवणार – अनिल दादा सावंत

राष्ट्रवादीच्या आत्मचिंतन बैठकीत अनिल सावंत यांनी घेतली पराभवाची जबाबदारी

पंढरपूर(प्रतिनिधी):- नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने कोणत्याही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपण पूर्ण ताकदीने लढवणार असून यासाठी आपली तयारी करणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी उमेदवार म्हणून मी घेतो. कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही पदाधिकारी, पक्ष कमी पडला असे मी म्हणणार नाही. कुठलाही सहकारी कमी पडला नाही,पक्षाने मला उमेदवारी दिली, त्यामुळे मी जबाबदारी घेतो. येणारा काळ हा राष्ट्रवादीचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा असेल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी मंगळवेढा येथील विचार मंथन बैठकी प्रसंगी कार्यकर्त्यांना दिली.

यावेळी माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाची विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मंगळवेढा येथे विचारमंथन बैठक घेण्यात आली. यावेळी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राहुल शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पुढे बोलताना अनिल दादा सावंत म्हणाले कि लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे जनता सोबत होती, तशीच जनतेची साथ यावेळी सुद्धा होती, लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. दहा पैकी सात आठ लोकांनी तुतारीला मतदान करणार असल्याचे लोक बोलत होते. विधानसभा निवडणुकीतील हा पराभव कसा झाला, याबाबत अख्खा महाराष्ट्र हळहळतोय, पवार साहेबांचा पक्ष, उद्धव साहेबांचा पक्ष संपवण्याचे हे कारस्थान आहे असे दिसते. दोन दिवसांपूर्वी पक्षाची बैठक झाली, त्यावेळी पक्षाने नव्या जोमाने पुढे जाण्याचे सांगितले आहे.

आज जे वातावरण दिसते आहे ते पुढील काळात नसेल, आपल्याकडून हा निकाल हिसकावून घेतला आहे, त्यांनी जिंकूनही आनंद साजरा केलेला नाही. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका आपण सर्व ताकदीनिशी लढवणार आहोत. गावागावात आपण शाखांचे नियोजन करू, आपल्या सुख दुःखात कायम आपल्या सोबत राहणार आहे. मंगळवेढा आणि पंढरपूर येथे माझे कार्यालय असून या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता आपल्या अडीअडचणी सांगू शकता त्या सोडवण्याचा सर्वस्वी प्रयत्न करणार आहे. यामध्ये अनिल सावंत, भैरवनाथ शुगर्स परिवार, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आपल्या सोबत असेल अशीही खात्री ही अनिल दादा सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close