राजकिय

सत्ता मिळवण्यासाठी धनगरांचा वापर करून घेणाऱ्या भाजपच्या पेकाटात काठी हाणायची वेळ आली आहे

नंदेश्वर येथील जाहीर सभेत भूषणसिंह होळकर यांचा भाजपवर हल्लाबोल

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सत्ता मिळवण्यासाठी धनगरांचा वापर करून घेणाऱ्या भाजपच्या पेकाटात काठी हाणायची वेळ आली आहे

नंदेश्वर येथील जाहीर सभेत भूषणसिंह होळकर यांचा भाजपवर हल्लाबोल

पंढरपूर(प्रतिनिधी):- मागील दहा वर्षात धनगरांनी आपली घोंगडी अंथरून भाजपाला सत्तेच्या सिंहासनावर बसविले. सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिले कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षण देतो म्हणणाऱ्या भाजपने धनगरांना फसविले. इतकेच नाही तर हजार कोटींचे तरतूद केल्याचे गाजर दाखवित एक रुपया सुद्धा दिला नाही. अशाप्रकारे सत्ता मिळवण्यासाठी धनगरांचा वापर करून घेणाऱ्या भाजपच्या पेकाटात काठी हाणायची वेळ आली आहे असे म्हणत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशजराजे भूषणसिंह होळकर यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी उमेदवार अनिल सावंत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, माजी सरपंच बाळासाहेब गरंडे,रड्डेचे माजी सरपंच सुरेश कांबळे, धनाजी गडदे, उपसरपंच आनंदा पाटील, किसन करे, काशिलिंग करे, माजी उपसरपंच अंकुश कांबळे, आप्पासाहेब मेटकरी, युवराज बंडगर, अंकुश गरंडे, सुनील कसबे, तुकाराम गरंडे, ज्ञानू गरंडे भाऊसाहेब गरंडे, भाऊसाहेब सलगर हे उपस्थित होते.‌

यावेळी बोलताना संग्राम माने म्हणाले की, दुष्काळी भागाला आजपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी फसविले आहे. पण अनिल सावंत यांनी मात्र भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला व बेरोजगारांना इथेच रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनिल सावंत हे इतर लोकप्रतिनिधींसारखे फसवा फसवी न करता ते करतात आणि मग बोलतात अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि असा लोकप्रतिनिधी जर आपल्या मतदारसंघाला मिळाला तरच आपला विकास होणार आहे.
यावेळी बोलताना उमेदवार अनिल सावंत म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात असू द्यात आपला वाढप्या ओळखीचा असला की ते काम अगदी सहजासहजी होऊन जाते. त्यामुळे मला तुमचा ओळखीचा वाढप्या समजून सहकार्य करा. मी तुमच्या पदरात नेहमीच वाढता घास टाकेन. आणि मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागासहित संपूर्ण मतदारसंघाचा विकास करेन.

[ मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील मातब्बर नेते माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिला. तसेच रड्डे गावचे माजी सरपंच सुरेश कांबळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, नंदेश्वर गावचे विद्यमान उपसरपंच आनंदा पाटील, अंकुश कांबळे यांनीही अनिल सावंत यांना पाठिंबा दिला. यामुळे अनिल सावंत यांना तालुक्याच्या दक्षिण भागात चांगला फायदा होणार असल्याची चर्चा होत आहे.]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close