ईतर

अनिल सावंत यांना विधानसभेसाठी नारीशक्तीचा आशीर्वाद लाभणार……

तुमची आणि माझी व्यथा सारखीच पाण्याचा प्रश्न सोडवत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार - अनिल सावंत

संपादक – दिनेश खंडेलवाल 

अनिल सावंत यांना विधानसभेसाठी नारीशक्तीचा आशीर्वाद लाभणार……

तुमची आणि माझी व्यथा सारखीच पाण्याचा प्रश्न सोडवत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार – अनिल सावंत

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काम सुरू असून शरद पवार यांच्याकडे विधानसभेसाठी तिकिटाची मागणी केली आहे. शरद पवारांचा आदेश व पक्ष निर्णयानुसार मी यापुढेही काम करीत राहणार असून या मतदारसंघात आत्तापर्यंत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सन्मानानारीशक्तीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आहे यावेळी महिलातूनच आपण निवडणूक लढवावी अशी मागणी होत असल्याने या विधानसभेत नारीशक्तीचा आशीर्वाद लागणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ याठिकाणी सिद्धापूर मंगल कार्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रमावेळी ते बोलत होते. खेळ पैठणी या कार्यक्रमाची सुरुवात अनिल सावंत आणि पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यामध्ये हा चौथा खेळ पैठणीचा कार्यक्रम होता. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यामध्ये एकूण तीन वेळा पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा वाढता प्रतिसाद आणि महिलांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा मंगळवेढा तालुक्यात पैठणी खेळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवेढ्याशी माझं विशेष नातं आहे. मंगळवेढ्याने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. आपल्या सर्वांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मी पैठणी कार्यक्रमाचे आयोजन केलंय. मी माळरानावर कारखाना उभा केला आहे. तुमची आणि माझी व्यथा एक सारखीच आहे. आपल्याला पाणी नाही. मी केवळ निवडणुका आल्यात म्हणून तुमच्याशी संवाद साधतो आहे असं नाही. येणाऱ्या काळात मी पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवणार आहे. उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी पंढरपूर मंगळवेढा जनतेसाठी भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून यापुढेही काम करत राहणार आहे. पवार साहेबांकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मला संधी द्या, या संधीचे मी सोने करीन अशी विनंती करत अनिल सावंत उपस्थित महिलांना आश्वासन दिले.

प्रारंभी अनिल सावंत व्यासपीठाकडे येत असताना महिलांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. महिलांनी केलेले स्वागत लक्षणीय होतं. या कार्यक्रमासाठी सुमारे साडेपाच हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. उपस्थित प्रत्येक महिलेस अनिल सावंत यांच्या बक्षीसाचे तसेच हस्ते साडीचोळीचे वाटप करण्यात आले. खेळ पैठणी या कार्यक्रमा दरम्यान बिस्किट खाणे, तळ्यात-मळ्यात, कावळा उड-चिमणी उड, डान्स, फुगा फोडणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

महिलांच्या प्रतिक्रिया –

[ पैठणी या कार्यक्रमाविषयी आणि अनिल दादांविषयी उपस्थित महिलांनी सांगीतले अनिल दादा आमचा भाऊ आहे. आमचे वैयक्तिक काम असलं तरी अनिल दादा आमची दखल घेतात. आम्ही आमच्या भावाला विधानसभेमध्ये पाठवणारच अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. ]

[ अनिल दादा खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करत असल्यामुळे, आम्हाला एक दिवस आमच्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. हक्काचं व्यासपीठ मिळतं. कार्यक्रम खूप छान होता, फराळाचीही व्यवस्था होती. दादा आमदार झाले तर आम्हाला खूप आनंद होईल. अनिल दादांनी दिलेली पैठणी नेसून दादांना मतदान करायला जाणार असल्याचं अनेक विजेत्या महिला स्पर्धकांनी सांगितले. ]

अनिल सावंत आणि पत्नी शैलेजा सावंत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. मंगळवेढा आणि पाटखळ मधील विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खेळ पैठणी या कार्यक्रमाच्या निवेदकाची जबाबदारी भारत मुढे यांनी पार पाडली.

यांना मिळाली बक्षीसे….….

1) मनीषा मुंगसे, तळसंगी (एलइडी टिव्ही)

2) अनुराधा वाघमारे, मारापुर (फ्रीज)

3) सुभद्रा पाटील, तळसंगी (वॉशिंग मशीन)

4) रचल मुंगसे, तळसंगी, (पिठाची चक्की)

5) अनिता मुंगसे, तळसंगी(शिलाई मशिन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close