राजकिय

पंढरपूर – मंगळवेढ्यातुन अनिल सावंत याना विजयी करा

माढ्याच्या सभेत खा. शरद पवार यांचे आवाहन

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर – मंगळवेढ्यातुन अनिल सावंत याना विजयी करा

माढ्याच्या सभेत खा. शरद पवार यांचे आवाहन

पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून येथील सभेत बोलताना सांगितले. दरम्यान पंढरपूर, मोहोळ, माळशिरस विधानसभा मतदार संघातील राष्ठ्रवादीचे उमेदवार अनुक्रमे अभिजित पाटील, अनिल सावंत, उत्तम जानकर, राजू खरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत प्रचंड जनसमुदायासमोर खा. पवार यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, खा. धैर्यशील मोहिते – पाटील, उमेदवार अनिल सावंत, अभिजित पाटील, राजू खरे, उत्तम जानकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. शरद पवार यांनी सांगितले कि,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत आहेत आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. अनिल सावंत यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समोर मोठे आव्हान उभा केले आहे. गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंढरपूरमध्ये तर रविवारी पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांची मंगळवेढा येथे प्रचार सभा संपन्न झाली. त्यानंतर खा. शरद पवार यांनीही अनिल सावंत यांच्या विजयासाठी टेम्भूर्णी येथील भव्य सभेत मतदारांना आवाहन केले आहे. या सभांमुळे मतदारसंघात अनिल सावंत यांचे मोठे आव्हान निर्माण झाला आहे.

[ सोलापूर जिल्ह्यातील विरोधकांना शरद पवारांची मोठी चपराक……
एकदा रस्ता चुकला की त्याला त्याची जागा दाखवायलाच पाहिजे, अशा लोकांना साधं सुद्धा पाडायचं नाही गाडलं पाहिजे, हे लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, “सगळ्याचा नाद करा पण पवारांचा….” एवढे म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्या शिट्ट्या आणि गर्जना होऊ लागली. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close