
संपादक – दिनेश खंडेलवाल
सहकारी पतसंस्थेत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था माळशिरस
पंढरपूर(प्रतिनिधी):- माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित माळशिरस याठिकाणी आज दिनांक एक ऑगस्ट रोजी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे संचालक धन्यकुमार अशोक काळे, व्ही. व्ही. घनवट यांनी पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
सदर वेळी पतसंस्थेचे संचालक धन्यकुमार काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपर माहिती सांगून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते. शेवटी पतसंस्थेचे संचालक व्ही. व्ही. घनवट यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.