सामाजिक

मराठा समाजाने नोकरी मागणारे नको नोकरी देणारे बनावे – शिवाजी काळुंगे पाटील

भव्य रक्तदान शिबीर व आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

संपादक-दिनेश खंडेलवाल

मराठा समाजाने नोकरी मागणारे नको नोकरी देणारे बनावे – शिवाजी काळुंगे पाटील

भव्य रक्तदान शिबीर व आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पंढरपूर :- मराठा समाजातील युवकांनी यशस्वी उद्योगपती व्हावे तरुणांनी उद्योगासाठी प्रयत्नशील असावे नोकरीच्या मागे लागू नये हे मनाशी बाळगावे नोकरी मागणारे नको नोकरी देणारे बनावे अशी प्रतिक्रिया अध्यक्ष स्थानावरुन बोलताना शिवाजी काळुंगे पाटील यांनी व्यक्त केली. ते अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक थोर मराठा कै‌. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मराठा समाजातील युवकांनी उद्योग, व्यवसाय करावा
मात्र प्रत्येक व्यवसायात स्वतः काम करण्याची तयारी असल्यावर तो व्यवसाय यशस्वी होतोच असे सांगितले. समाजात काम करताना
चळवळीची गरज असते. चळवळीतून केलेली मागणी यशस्वी होते. चळवळीचा विषय किती तानायचं हे समजलं पाहिजे तसेच कुठे थांबायचे हेही समजले पाहिजे असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक थोर मराठा कै‌. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंहगर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मराठ्यांसाठी मार्गदर्शीका ठरणारे “आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार प्रशांत परिचारक, मा. जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख,मा नगराध्यक्ष नागेश काका भोसले, किरण आप्पा भोसले,डॉ. मंदार सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आलाया वेळी दत्तात्रय काळे,शंकर सुरवसे, नितीन करंडे, भास्कर जगताप, संदिप पाटील, विश्वजीत भोसले, गणेश जाधव, सोपानकाका देशमुख,तानाजी मोरे, धनराज लटके,सागर चव्हाण, स्वप्नील गायकवाड, माऊली काळे, निलेश कोरके, आकाश पवार हे उपस्थित होते. प्रास्तावीक अर्जुनराव चव्हाण यांनी केले तर सुत्र संचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले‌.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी मोरे, सचिन गंगथडे,संतोष जाधव, अमोल पवार,सतिश धनवे सर,गुरुदास गुटाळ,शामराव साळुंखे,नागेश गायकवाड, काका यादव, हणमंत कदम,रोहित चव्हाण, पांडुरंग शिंदे,सचिन थिटे,गणेश काळे,नागेश कोरके,अमर शिंदे, दिगंबर खपाले,संतोष घाडगे, विलास बागल,शहाजी बागल,विजय बागल, आण्णा मलपे,विलास देठे सर,औदुंबर डीसले,नाना शिंदे,अभिजित शिंदे,शिवम जाधव,विनायक पडवळे, अजिनाथ कदम,राजेंद्र चव्हाण, सतिश शिंदे,अमर सुरवसे,ॲड प्राजक्ताताई शिंदे,प्रभावतीताई गायकवाड, अश्विनीताई साळुंखे,डॉ संगीताताई पाटील,नाईकनवरे ताई यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close