पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी पुनश्च दत्ताजीराव पाटील तर तालुकाध्यक्षपदी तानाजी जाधव यांची निवड जाहीर
शहर कार्याध्यक्षपदी दिनेश खंडेलवाल;अधिस्वीकृती साठी पत्रकारांना सर्वतोपरी मदत करणार-रामचंद्र सरवदे

संपादक-दिनेश खंडेलवाल
पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी पुनश्च दत्ताजीराव पाटील तर तालुकाध्यक्षपदी तानाजी जाधव यांची निवड जाहीर
अधिकृतीसाठी पत्रकारांना सर्वतोपरी मदत करणार-रामचंद्र सरवदे
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शहर व तालुका कार्यकारीणीची बैठक पार पडली यामध्ये पंढरपूर शहराध्यक्षपदावर दत्तात्रय पाटील यांची पुनश्च निवड करण्यात आली तर पंढरपूर तालुका अध्यक्ष पदासाठी तानाजी जाधव यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात बैठक संपन्न झाली.
या कार्यकारिणीच्या बैठकीत पंढरपूर शहराध्यक्षपदी पुनश्च दत्ताजीराव पाटील व कार्याध्यक्षपदी दिनेश खंडेलवाल यांची निवड झाली, उपाध्यक्षपदी रफिक आतार, सचिव विनोद पोतदार, सहसचिव विश्वास पाटील, खजिनदार चैतन्य उत्पात, सह. खजिनदार प्रकाश इंगोले, शहर संघटक लखन साळुंखे, शहर प्रसिद्धीप्रमुख रामकृष्ण बिडकर, शहर समन्वयक सचिन कुलकर्णी, शहर संपर्कप्रमुख नागेश काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच तालुकाध्यक्षपदी तानाजी जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष कांबळे, उपाध्यक्ष नामदेव लकडे, सचिव अशोक पवार, सहसचिव तानाजी सुतकर, खजिनदार गणेश देशमुख, सहखजिनदार खानसाब मुलानी, तालुका संघटक अजित देशपांडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल गुरव, तालुका संपर्कप्रमुख धीरज साळुंखे आदिंची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार म्हणाले की पत्रकारांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असणारी सुरक्षा समिती असून विविध उपक्रमाद्वारे, आंदोलनाद्वारे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी जाहिर केले. पत्रकारांची शासकीय नोंद व्हावी म्हणून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहिर केले. तसेच प्रिंट मिडीया, डिजीटल मिडीया असा भेदभाव या संघटनेत केला जाणार नाही असेही ते म्हणाले. पत्रकारांच्या मागण्या व अडचणी तसेच त्यांचे आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशिल राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी प्रकर्षाने सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी आपल्या उद्बोधक भाषणात पत्रकारांवर होणार्या अन्याय व अत्याचारा विरोधात सुरक्षा समितीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो तसेच अधिस्विकृती मिळविण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान साप्ताहिक, दैनिकांतील वार्ताहार, पत्रकारांना येणार्या अडचणींना सहकार्य करणार असेही अभिवचन त्यांनी दिले. यानंतर सचिन कुलकर्णी यांनी डिजीटल मिडीयाचे महत्त्व सर्वांसमोर मांडले. प्रशांत माळवदे, दत्ताजीराव पाटील, बाहुबली जैन यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
या बैठकीत पंढरपूर विभागीय संपर्कप्रमुख म्हणून प्रशांत माळवदे यांची तर पंढरपूर विभागीय जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून रविंद्र शेवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र शेवडे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद पोतदार यांनी केले.
याप्रसंगी सर्वश्री अक्षय बबलाद संपादक दै. लोकशाही मतदार, प्रा. अशोक डोळ सा. जन डांगोरा, बाहुबली जैन, संजय यादव, अमर कांबळे, राहुल रणदिवे व पत्रकार सुरक्षा समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.