क्राइम

एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक; १०१ कार्डा सह दोन आरोपींना केली अटक

आरोपिंनी ठाणे शहर,नवी मुंबई,पुणे,नाशिक,पंढरपूर या हद्दीत केले गुन्हे

संपादक-दिनेश खंडेलवाल

एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक; १०१ कार्डा सह दोन आरोपींना केली अटक

आरोपिंनी ठाणे शहर,नवी मुंबई,पुणे,नाशिक,पंढरपूर या हद्दीत केले गुन्हे

पंढरपूर : वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना फसवण्याचे प्रकार सध्या विविध ठिकाणी दिसून येत आहे. संगणक युगामध्ये आणि इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते अशाच फसवणुकीच्या प्रकारांमधील दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरचे आरोपी हे एटीएम कार्डाची अदलाबदल करून नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबवत होते.

या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी “एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरीकांची फसवणुक करणा-या टोळीतील दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांचे संयुक्त कार्यवाही मध्ये पोलीसांनी घेतले ताब्यात सदर आरोपींकडे मिळाली वेगवेगळया बँकाची १०१ एटीएम कार्ड” कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्यांचे दणाणले ढाबे

ठाणे शहर, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर परीसरात एटीएम मध्ये जाणा-या नागरीकांना बोलण्यात गुंतवुण ठेवुन त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरीकांची फसवणुक करून रक्कम काढुन नेण्याबाबतचे तकारींचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना सदरचे फसवणुकीचे गुन्हयांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्हयांचा कौशल्यपूर्ण तपास करणेबाबत वेळोवेळी वरीष्ठांकडून सुचना व मार्गदर्शन मिळाले होते.

पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये घडलेल्या गुन्हयांचा तपशिल संकलीत करून घटनास्थळांवरील कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून एटीएम कार्ड बदली करून फसवणुक करणा-या सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने मार्ग काढत असताना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी शाखा यांना पाहीजे असलेले आरोपी १) सनी उर्फ चिकण्या मुन्ना सिंग वय २७ रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पुर्व, जि.ठाणे मुळ जि. कानपूर, उत्तरप्रदेश २) श्रीकांत प्रकाश गोडबोले वय २८ वर्ष, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी उल्हासनगर २, जि ठाणे हे दि ०९/०१/२०२३ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आहेत. अशी माहीती पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे, नेमणुक-खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता सदरचे आरोपीबाबत माहीती कळविली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी तात्काळ दोन पथके तयार करून आरोपींचा कसोशीने शोध घेण्यास सुरवात केली तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सिनेस्टाईल प्रमाणे वरील आरोपी १) सनी उर्फ चिकण्या मुन्ना सिंग वय २७ रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पुर्व, जि. ठाणे मुळ कानपूर, उत्तरप्रदेश जि. २) श्रीकांत प्रकाश गोडबोले वय २८ वर्ष, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी उल्हासनगर २, जि ठाणे यांना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांचेकडे वेगवेगळया बँकांचे एकुण १०१ एटीएम कार्ड मिळाले आहेत. चौकशी केली असता त्यांनी या पुर्वी ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सदरचे आरोपींना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही करीता खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांचेकडे हस्तांतरीत करण्याची प्रकीया चालू आहे.

सदरची कार्यवाही शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर, अरूण फुगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोना / २२१ प्रसाद औटी, पोना / १६५ समाधान पाटील, पोशि/ २१८७ माधव वडडेटीवार, पोशि/ १९०४ निलेश कांबळे, चालक पोशि/ १०४३ रामकिसन खेडकर सायबर पोलीस ठाण्याचे पोशि/ अन्दर आत्तार तसेच खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर यांचेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे यांनी पार पाडली असुन पुढील तपास खंडणी विरोधी शाखा,पोलीस आयुक्तालय ठाणे शहर हे करीत आहेत. सदर कारवाईमुळे खंडणी विरोधी गुन्हे शाखेचे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close