भ्रष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे — ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे
शालेय विद्यार्थानी सुरू केलेल्या "अरिहंत बुलेटिन" या वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : भ्रष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, ह भ प बाळासाहेब बडवे यांनी केले. अरिहंत पब्लिक स्कुल येथे शनिवार दि ८ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पंढरपूर येथील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरिहंत पब्लिक स्कुलचे सचिव सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ शीतल के शहा,उज्वल दोशी,पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे,भगवान वानखेडे, रविंद्र लव्हेकर, नवनाथ पोरे,विरेंदसिंह उत्पात,संकेत कुलकर्णी,पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,राजेश शिंदे,तानाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब बडवे म्हणाले की पत्रकारिता चालू ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेक पत्रकार हलाखीचे जीवन जगत आहेत आणि काही स्वार्थी,ढोंगी लोक पत्रकारांचा वापर केवळ स्वार्थसाठी करतात. शहा डॉक्टरांच्या हाताला परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे. त्याशिवाय एवढे यश मिळणे शक्य नाही. डॉक्टर शीतल शहा यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असली तरी भारतीय संस्कृतीचा त्यांना विसर पडलेला नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आज या संस्थेला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. इवल्याशा रोपट्याचा भलामोठा वटवृक्ष झाला आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी “फ्री विंग्स” या भित्तीपत्रकाचे आणि “अरिहंत बुलेटिन” या शालेय विद्यार्थानी सुरू केलेल्या वाहिनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका सुप्रिया बहिरट यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उज्वल दोशी यांनी यांनी अभ्यासा बरोबरच ईतर ज्ञान देण्यात येते असे सांगितले. यानंतर संकेत कुलकर्णी, रामभाऊ सरवदे,भगवान वानखेडे, हरिभाऊ प्रक्षाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी अभय जोशी, सुनील दिवाण,चैतन्य उत्पात, महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, विजयकुमार कांबळे,तानाजी जाधव,संतोष कांबळे,नामदेव लकडे, विनय हरिदास,मंदार लोहोकरे,सुरेखा भालेराव,सचिन कसबे,महालिंग दुधाळे, माऊली डांगे,संजय कोकरे,रवींद्र शेवडे,दिनेश खंडेलवाल,विजयकुमार कांबळे, रफिक आतार, बाहुबली जैन,रामकृष्ण बिडकर, तानाजी धुमकर,भारत शिंदे,लखन साळुंखे,नामदेव लकडे,दिनेश नकाते, नितीन शिंदे,महेश कदम,भारत नागणे, राजकुमार शहापुरकर,शंकर पवार,धीरज साळुंखे,सचिन कांबळे,राजू पवार,हरिभाऊ प्रक्षाळे, अरुण बाबर,विनोद पोतदार,विकास पवार,नागनाथ सुतार,राजेंद्र काळे, कबीर देवकुळे, यशवंत कुंभार,डॉ राजेश फडे,खटकाळे, अपराजित सर्वगोड,अविनाश साळुंखे,सोहन जैस्वाल,सचिन कुलकर्णी, अजित देशपांडे, संजय यादव,श्रीकांत कसबे,संजय यादव,कुमार कोरे ,आदपुरे आदी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया बहिरट यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक-दिनेश खंडेलवाल, पंढरपूर mail -lokpatranewsppur123@gmail.com