शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा गाठ मनसेशी- मनसे नेते दिलीपबापू धोत्रे
संतप्त शेतकऱ्यांचा भोसे येथे पाच तास रास्ता रोको आंदोलन

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : वीज वितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी मागील एक ते दीड महिन्या पासून वीज पुरवठा खंडित केला होता तो पूर्ववत करावा या मागणीसाठी पंढरपूर टेंभुर्णी रोडवर तब्बल पाच तास मनसे,स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना यांच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील,डी व्ही पी ग्रुप चे अभिजित पाटील, यांच्या नेत्रृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आम्ही वीज बिल भरू पण वीज पुरवठा सुरळीत करा या मागणीवर वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी रोखून धरलेला रस्ता खुला केला
मागील १ ते २ महिन्यापासून शेती पंपाच्या वीज बिलाच्या वससुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मागील दोन वर्षापासून कोरोना अतिवृष्टी महापूर व मागील वर्षाचे उसाचे बिल न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये महावितरणच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे. परंतू आत्ता तीन महिन्यांत परत एकदा महावितरण शेती पंपाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.
नुकत्याच ऊस तोडी सुरू झाले असून अजून वर्षाचे किंवा या उसाचे बिल मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त मुदत मिळावी शेतकरी थोडेफार बील भरतील परंतु महावितरणने बेकायदेशीरपणे पूर्ण वीजपुरवठा खंडीत केला आहे. जर महावितरण पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा विज सोडणार नसेल तर शेतकरी ही महावितरण वर कोर्टातून कायदेशीर कारवाई करेल. त्यामुळे महावितरणच्या या पठाणी वसुली वर लगाम घालावा व चुकीची वीजबिले, वाढीव एचपी वीज बिल आकारणी शेतकऱ्यांचे डी.पी. भरून न देणे,शेतकऱ्यांना केबल दुरुस्तीचे साहित्य न देणे या गोष्टीमध्ये महावितरणने पारदर्शकता आणावी मगच बिल मागावे व शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी २० डिसेंबर रोजी सकाळी सवा आकारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना,मनसे आदींसह शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला परंतु वीज बिल भरा मगच वीज पुरवठा सुरळीत करू अशा आडमुठ्या भूमिकेत महावितरण अधिकारी असल्याने आंदोलन कर्त्यांनी वीज भरू परंतु अगोदर वीज पुरवठा सुरळीत करा अशी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली परंतु साडे चार तासांनंतर आंदोलन स्थळी पोहचलेले वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोनवरून वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या परंतु गवळी हे अधीक्षक अभियंता यांच्या आदेशशिवाय वीज पुरवठा सुरळीत करता येणार नसल्याच्या भूमिकेत होते. अखेर अधीक्षक अभियंता यांच्याशी दिलीप धोत्रे यांनी फोनवरून आम्ही सोलापूरला येऊन तुमच्या बरोबर चर्चेला येतो परंतु याठिकाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अगोदर वीज पुरवठा सुरळीत करा अशी ठाम भूमिका मांडली आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली मनसेचे दिलीप धोत्रे,डी व्ही पी ग्रुपचे अभिजित पाटील, स्वाभिमानीचे तानाजी बागल, सचिन पाटील, भारत कोरके, शहाजान शेख, रणजित बागल,नितीन बागल, दत्तात्रय व्यवहारे, बाळासाहेब माळी, महेश खटके,नागनाथ तळेकर, सचिन अटकळे, मारुती कोरके, मोहन तळेकर, अनिल व्यवहारे, तानाजी बागल, संजय तळेकर, नामदेव कोरके, अविनाश पाटील, रामचंद्र सुळ, चांगदेव तळेकर,सचिन भिंगारे, जयवंत थिटे,अमर इंगळे,इत्यादी उपस्थित होते.
[चौकट
वीज पुरवठा बंद केल्याने लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी नाही जनावरांचे हाल बघवत नाहीत म्हणून
दोनशे डी पी चे प्रत्येक डी पी ला शेतकऱ्यांचे पाच रुपये प्रमाणे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी स्वतः जवळील दहा लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली आणि त्वरित वीज पुरवठा सुरू करा अशी मागणी केली.]
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com