ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार – सरपंच ऋतुराज सावंत

संपादक – दिनेश खंडेलवाल
ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार – सरपंच ऋतुराज सावंत
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी नागटिळक,१०० मुस्लिम युवकांचा जाहीर पाठिंबा
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील इनामदार वस्ती येथील शिवाजी नागटिळक यांच्यासह मुस्लिम समाजातील १०० युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत, रवी सावंत यांच्या उपस्थितीत अनिल सावंत गटामध्ये व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात महाविकास आघाडीची पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन राज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध व कुटुंब रक्षण २५ लाखांपर्यंत आरोग्य विभागामार्फत मोफत देण्यात येणार आहे. अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही वाकाव सरपंच ऋतुराज सावंत यांनी दिली.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, शिवाजी नागटिळक, मुस्लिम समाजातील युवक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.