बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरीत मूक मोर्चा
महिला पुरुष एकत्रित येत तहसीलदार सचिन लंगुटे यांना दिले निवेदन
संपादक – दिनेश खंडेलवाल
बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरीत मूक मोर्चा
महिला पुरुष एकत्रित येत तहसीलदार सचिन लंगुटे यांना दिले निवेदन
पंढरपूर(प्रतिनिधी):- बांगलादेशातील हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर शहरातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केला. यासाठी मूक मोर्चा काढून तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.
बांगलादेश येथे काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे. विशेष म्हणजे बांगलादेशचे लष्करच यासाठी सहकार्य करीत असल्याचे पुरावे पुढे आले आहेत. हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर येथील सकल हिंदू समाजाने एकत्रित मानवाधिकार मूक मोर्चा काढला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील टिळक स्मारक मैदानात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय मूक मोर्चा काढला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हातात बांगलादेशातील हिंदूंना पाठिंबा देणारे फलक होते.
याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून हिंदू बांधवावर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.