सामाजिक

डान्स स्पर्धेतील नृत्य आविष्काराने जिंकली नागरिकांची मने

केडी ग्रुपच्या सादरी करणारा पालकांसह नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

संपादक-दिनेश खंडेलवाल

डान्स स्पर्धेतील नृत्य आविष्काराने जिंकली नागरिकांची मने

केडी ग्रुपच्या सादरी करणारा पालकांसह नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

पंढरपूर :- लहान मुला मुलींसह तरुणाईने आपल्या डान्सच्या अदाकारीने प्रेक्षकांना खुर्चीला खेळवून ठेवले होते. असे एक से बढकर एक डान्सच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी पालकांसह नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुर येथे राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. या महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये लोकनृत्य, लावणी, मावळ्याच्या वेशभूषेतील नृत्य यासह विविध नृत्य प्रकाराने उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
केडी डान्स अकॅडमीच्या माध्यमातून पंढरपुरातील कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यातील कलाकारांना युवक नेते भगीरथ भालके यांच्या वतीने सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या महोत्सवामध्ये दिड टनाचा गजकेसरी रेडा, पंढरपुरी म्हैस,अडीच फुटाची पंगणूर गाय, विविध प्रकारचे पक्षी,बदक, जातीवंत बोकड,आठ किलचा मोठा कोंबडा, पार्सियन मांजर, याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेती औषधे, अवजारे, विविध गृह उपयोगी वस्तू, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, खवय्यांसाठी खास पदार्थांची मेजवानी याचबरोबर संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डॉग शो, कॅट शो, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू, होम मिनिस्टर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.प्रणिताताई भालके यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close