ईतरबिझनेस

भीमा साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज, बॉयलर प्रज्वलित

भीमाची बॉयलर प्रदीपनाने हंगाम शुभारंभाची नांदी;ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण

  1. संपादक – दिनेश खंडेलवाल 

भीमा साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज, बॉयलर प्रज्वलित

भीमाची बॉयलर प्रदीपनाने हंगाम शुभारंभाची नांदी;ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारा भीमा कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित करून चालू गळीत हंगामासाठी भीमा साखर कारखाना सज्ज झाला आहे. यामुळे ऊस उत्पादकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असेल आज बॉयलर पूजन करून अग्नी प्रदीपनाने हंगामाची सुरुवात करण्यात आली.

भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि. सोलापूर या संस्थेचा सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा “४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ” संस्थेचे “मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार धनंजय भिमराव महाडिक व संस्थेचे “चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक” यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला.

सदर मंगल प्रसंगी संस्थेचे “संस्थापक अध्यक्ष कै.पै.भिमराव दादा महाडिक” यांच्या फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करणेत आली.

“सत्यनारायण महापूजा” सकाळी ठीक ७ वाजता संस्थेच्या विद्यमान संचालिक सौ.सिंधू चंद्रसेन जाधव व चंद्रसेन मुरलीधर जाधव या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली.

तसेच “बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ” संस्थेचे विद्यमान संचालक तात्यासो ज्ञानोबा नागटिळक व सौ. सुजाता तात्यासो नागटिळक या उभयतांचे व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न झाला.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सुनील दादा चव्हाण यांनी सन २०२५-२६ चा ४६ वा गळीत हंगाम सुरू करणेकरिता कारखान्याची आवश्यक ती सर्व कामे पुर्णत्वास आलेली असून तोडणी व वहातुक यंत्रणा सज्ज झालेली आहे अशी माहिती बोलताना दिली.

सदर प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक खालीद शेख,विद्यमान संचालक बिभीषन वाघ, सिद्राम मदने, अनिल गवळी, राजेंद्र टेकळे, सुनिल चव्हाण, संभाजी कोकाटे, संतोष सावंत, बाळासाहेब गवळी तसेच उत्तम मुळे,झाकीर मुलाणी, राजाराम बाबर,भारत पाटील,किसन जाधव, छगन पवार,पापा चव्हाण, सभासद, शेतकरी,पत्रकार, कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close