राजकिय

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ

माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ

संपादक – दिनेश खंडेलवाल 

भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ

माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते श्री.सिद्धेश्वर मंदिर माचणूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळी ८.३० वाजता माचणूर, १०.४५ वाजता मुंढेवाडी, ११.३० वाजता रहाटेवाडी, १२.१५ वाजता तामदर्डी, १.०० वाजता अरळी, दुपारी २.४५ वाजता सिद्धापूर, ३.४५ वाजता अरळी, ४.३० वाजता नंदूर, सायं.५.१५ वाजता डोणज, ६.०० वाजता भालेवाडी, ७.०० वाजता बोराळे असा हा प्रचार दौरा संपन्न होणार आहे.

आमदार समाधान आवताडे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार समाधान आवताडे यांची भाजपा व महायुतीचे उमेदवारी घोषित केली आहे. रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण इत्यादी मूलभूत आणि पायाभूत विकास बाबींमध्ये त्यांनी केलेले भरीव कार्य त्यांना या निवडणुकीत प्लस पॉईंट ठरणार आहे.

तरी वरील दौऱ्यासाठी संबंधित गावातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close