ईतर

बी आर एस पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवल्या जाणार-आमीर आत्तार

महाराष्ट्राच्या राजकारणात बी आर एस पक्षाची होणार एंट्री

बी आर एस पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवल्या जाणार-आमीर आत्तार

महाराष्ट्राच्या राजकारणात बी आर एस पक्षाचे होणार एन्ट्री

पंढरपूर :- “अबकी बार किसान सरकार” या मथळ्याखाली महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी डिजिटल बोर्ड झळकू लागले असून राज्यातील येणार्या कालावधीतील सर्वच निवडणुका बी आर एस पक्षाकडून लढविल्या जाणार आहेत अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र संघटक व (सोलापूर जिल्हा निरीक्षक)अमीर आत्तार यांनी दिली.

भारतीय राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एस पक्षाकडून महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये या पक्षाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जात असून येणाऱ्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा या सर्वच निवडणुकीमध्ये बी आर एस पक्षाचे उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे.

राज्यातील अनेक आजी माजी आमदार या पक्षाच्या संपर्कात असून काही थोडक्यात निवडून येऊ न शकलेले उमेदवार ही या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका लढवू शकतात. त्यामुळे अल्पावधीतच “अबकी बार किसान सरकार” म्हणत तामिळनाडू येथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारतीय राष्ट्र समिती बी आर एस पक्ष महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून प्रत्येक निवडणूका लढवण्याच्या तयारीत आहे.

यासाठी ठिकठिकाणी पदाधिकारी व सदस्य करण्याची मोहीम राबवली जात आहे. बी आर एस पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व इतर पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येते. या पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार असेल. तसेच गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी बी आर एस पक्षाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ही पश्चिम महाराष्ट्र संघटक व (सोलापूर जिल्हा निरीक्षक)अमीर आतार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close