
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : सांगलीच्या विष्णुअण्णा फळ मार्केट बाजार समितीतील कांद्याचे दलाल व व्यापारी यांनी २ हजार ६०० रुपये भाव असणारा कांदा लिलावामध्ये फक्त पाच रुपये किंमत केल्याने कांद्याचे भाडेही शेतकऱ्याला मिळत नसल्याचे पाहताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले व बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडून न्यायाची मागणी करण्यात आली.
या बाजार समितीत सुरू असलेले कांद्याचे सौदे शेतकर्यांचे हिताचे नसुन शेतकऱ्याने पिकवलेला कांदा आंणण्यासाठी लागलेले भाडे व दर पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
याबाबतची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, इंदापूर, माढा,येथील शेतकऱ्यांनी केली सव्वीसशे रुपये असलेला कांद्याचा भाव व्यापाऱ्यांनी व दलालांनी आज पाचशे रुपये वर आणला आहे. यामध्ये आपण लक्ष घालणे अशी मागणी केली दरम्यान राजू शेट्टी यांनी दिलेल्या आदेशावरून संदीप राजोबा व शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले.
जोपर्यंत दलाल व व्यापारी पूर्वीप्रमाणे कांदा खरेदी करणार नाहीत तोपर्यंत बाजार समितीच्या गेटला कुलपे घालण्यात येतील व सगळा कांदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकून दिला जाईल जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत सभापती च्या केबिन मधून उठणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले तेव्हा कांदा दलाल व व्यापारी झुकले अखेर पाचशे रुपये क्विंटलचा कांद्याचा भाव सव्वीसशे रुपये भावाने खरेदी केला तेव्हा आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी उपस्थित मार्केट कमिटीचे संचालक कुमार पाटील,सचिव महेश चव्हाण, दीपक पाटील, सुशील काशीद, श्रीकांत गवळी, दीपक गवळी, सुरेश बिराजदार, प्रशांत लेंडवे, सतीश खोमणे, बापू फडतरे, सिताराम असवे, संतोष बारले, बापू जाधव यांना बिराजदार, अर्जुन पायगोंडे,नितीन चोरडे, समाधान जाधव, महादेव गुंडगे, अमोल गवळी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com