ईतर

राज्यातील साखर कारखान्यांकडून यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन, निर्मितीचा ही उच्चांक

सणा दरम्यान साखरेचा तुटवडा होणार नाही- साखर आयुक्त

संपादक-दिनेश खंडेलवाल

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून साखर निर्मितीचाही आलेख वाढला आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्यात सणासुदीला साखरेचा कोणताही तुटवडा होणार नाही अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

राज्यातील सुमारे १९० साखर कारखान्यांनी या वर्षीच्या गाळप हंगामात सुमारे १३७ लाख टन विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत राज्यातील काही कारखाने सुरू असून येत्या ३ ते ४ दिवसांत शिल्लक ९३ हजार टन उसाचे गाळप होईल. १५ जूनला शेवटचा कारखाना बंद होईल.

राज्यातील
लातूर मधील ५, अहमदनगर मधील ४ तसेच जालना, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणचे प्रत्येकी १ याप्रमाणे १२ ते १३ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. उसाची मोळी टाकणे बंद झाले तरीही एक दिवस कारखाना सुरू ठेवावा लागतो. त्याप्रमाणे काही कारखाने सद्यस्थितीत सुरू आहेत.

प्रत्यक्षात फक्त ९३ हजार टन ऊस शिल्लक असून चालू कारखान्यांकडून येत्या ३ दिवसांत त्याचेही गाळप होईल अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की यंदा कारखान्यां कडून विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. मात्र तरीही साखर निर्यात, इथेनॉल निर्मिती यामुळे कारखान्यांना रक्कम मिळत गेले. कारखान्यांनी ती रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी (उसाची रास्त किफायतशीर किंमत) देण्यासाठी वापरले. त्यामुळेच ९६ टक्के एफआरपी नियमानुसार अदा करता आली.

विषेश म्हणजे एकाही साखर कारखान्यांवर नोटीस बजावण्याची वेळ आयुक्त कार्यालयावर आली नाही. दरम्यान केंद्र सरकारने निर्यातीवर काही प्रतिबंध लागू केले असले तरी त्यापूर्वीच राज्यातील कारखान्यांनी साखरेच्या निर्यातीचे करार केलेले आहेत. राज्यातील १३७ लाख टन साखरे पैकी ५१ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. तरीही राज्यात गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक आहे. त्यामुळे दिवाळी व अन्य सणांच्या वेळी राज्यात कुठेही साखरेची तुटवडा निर्माण होणार नाही असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close