सर्वसामान्यांच्या मनातील उमलते नेतृत्व भावी आमदार अभिजीत आबा पाटील……
अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
संपादक-दिनेश खंडेलवाल
सर्वसामान्यांच्या मनातील उमलते नेतृत्व भावी आमदार अभिजीत आबा पाटील……
अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
पंढरपूर:- पंढरपूर तालुक्यातील देगाव या लहान खेड्यात (कै.) धनंजय विठ्ठल पाटील यांच्या पोटी १ ऑगस्ट १९८३ रोजी एक रत्न जन्माला आले. ते म्हणजे अभिजीत आबा पाटील. आर्थिक परिस्थिती बेताची परंतु वैचारिक श्रीमंती असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. अध्यात्माचा वारसा असलेल्या पाटील घराण्याची परंपरा खूप मोठी आहे. औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केले होते तेंव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देगावचे सूर्याजी पाटील यांनी त्यांच्या शेतातील विहीरीत आणि वाड्याच्या तळघरात सुरक्षित ठेवली होती. या सूर्याजी पाटील यांचे थेट वंशज म्हणजे अभिजीत आबा पाटील.
अभिजीत आबा पाटील म्हणजे प्रचंड जिद्द आणि चिकाटी असलेले आदर्श नेतृत्व कोरोना काळात शेकडो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी परिश्रम घेतलेले नेतृत्व, सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या विषयी तळमळ असणारे नेतृत्व,चहाच्या टपरीवर बसून सामान्यांशी एकरुप होणारे नेतृत्व रात्री अपरात्री कारखान्यांवर जाऊन कामगारांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व, दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व, भावी आमदार म्हणून जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलेले नेतृत्व, अहोरात्र काम करणारे, उत्साही आणि आशादायी नेतृत्व, प्रत्येकाशी आपलेपणाने बोलून त्याला मदत करण्याची भूमिका घेणारे आश्वासक नेतृत्व, भविष्याचा वेध घेऊन पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या विकासासाठी जिद्दीने काम करण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणजेच अभिजीत आबा पाटील असे सांगितले जाते.
युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या सोबत १७० मित्र परिवार यांनी एकत्रितपणे डीव्हीपी उद्योग समूहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. चार जिल्ह्यातील चार साखर कारखाने घेवून धाराशिव साखर कारखाना युनिट १, २, ३ व ४ हे अल्पावधित नावारूपास आलेले अभिजीत पाटील यांची दुरदृष्टी व खंबीर मित्रांची साथ संस्थेवर असलेले प्रेम आणि कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा यातून हा उद्योग दरवर्षी प्रगती करत आहे. कामातील प्रामाणिकपणा यामुळेच चार साखर कारखाने प्रगतीपथावर आहेत. ऊस वाहतूक ठेकेदार ते चार साखर कारखान्यांचा चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास सुरु आहे.
चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे आबांनी सोलापूर जिल्ह्यातील तरुण वर्गांना आपल्या कामाने आपलेसे केलेले आहे. आबांचे व्यक्तिमत्व अभ्यासू असल्यामुळे तसेच सर्व गोष्टींचा इत्यंभूत अभ्यास करून त्या विषयावर भाषण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. हसरा चेहरा, प्रेम आपुलकीने सर्वांशी वागणे-बोलणे असल्यामुळे तरुण वर्गामध्ये आबांचे विशेष आकर्षण आहे.
ऑक्सिजन निर्मितीतून वाचविले शेकडो जीव…
संपूर्णदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला, लोक जीवानीशी जावू लागले, त्यावेळी देशाचे नेते शरद पवार यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या साखर कारखान्यांत ऑक्सिजन निर्मितीचे शिवधनुष्य उचलले.
साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती खरेतर हे धाडसाचे पाऊल होते. या प्रकल्पाला पूर्ण करण्यास कमीतकमी तीन महिने तरी लागतील असे जाणकारांचे मत होते. मात्र, हा प्रकल्प १५ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास अभिजीत आबा पाटील यांनी घेतला. त्यासाठी तोटा सहन करून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवला. दिवसाचे चोवीस तास अविरतपणे काम करून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल करून फक्त काही मोजकेच पार्टस परदेशातून मागवून संपूर्ण भारतीय बनावटीचा राज्यातील नव्हे तर संपूर्णदेशातील साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १५ दिवसांमध्ये चालू केला. या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, देशाचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व इतर मान्यवरांनी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले. हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढले. हा ऑक्सिजन प्रकल्प देशासाठी दिलासादायक व इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे अभिजीत आबा पाटील हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अभिजीत आबा पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
व्यक्तिविशेष
________________
दिनेश खंडेलवाल