भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी सहा औषधोपचार केंद्र;वैद्यकीय सेवा सज्ज
सुसज्ज ६ रुग्णवाहिका;१२० आरोग्य अधिकारी कर्मचारी
संपादक-दिनेश खंडेलवाल
भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी सहा औषधोपचार केंद्र; वैद्यकीय सेवा सज्ज
सुसज्ज ६ रुग्णवाहिका;१२० आरोग्य अधिकारी कर्मचारी
पंढरपूर : नवीन वर्षातील पहिलीच यात्रा म्हणजे चैत्र यात्रा या चैत्री यात्रेमध्ये पंढरपूरात येणारे भाविक आरोग्यसंपन्न रहावे. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी ६ ठिकाणी औषधोपचार केंद्र उपभारण्यात आले असून त्यामध्ये १२० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात येत आहे.
तसेच शहरात ७ ठिकाणी सर्व सुविधायुक्त ६ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.चैत्री यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आरोग्य विभाग तसेच तालुका आरोग्य विभागाकडून पत्राशेड, वाळवंट, दर्शन मंडप,पोलिस संकुल, ६५ एकर, गोपाळपूर येथे औषधोपचार केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
आवश्यकतेनुसार रक्तपेढीची सोय करण्यात आलेली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णासआरोग्यसेवा देण्यास तत्पर आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेड,आयसीयू विभाग तयार करण्यात आले आहे.
पंढरीत चैत्र यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
शहरातील काळा मारुती येथील डॉक्टर दिग्विजय केंदुळे हे रुग्णांना चांगली सेवा देत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी होत आहे येणाऱ्या रुग्णांना त्या त्या आजारावरील औषधे इंजेक्शन दिले जात होते. यासाठी औषधाचा पुरेसा साठा असल्याचे दिसून आले. प्रदक्षणा मार्गावरील हे आरोग्य केंद्र असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. खोकल्याचे रुग्ण सर्वात जास्त असल्याचे यावेळी डॉक्टर दिग्विजय केंदुळे यांनी सांगितले. त्याचबरोबर भाविकांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करावे गर्दीमध्ये मास्क लावावे अशा सूचना ही प्रत्येक रुग्णांना देत होते. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा स्टाफही व्यवस्थितरित्या काम करत असताना दिसत होता.
दरम्यान पत्रा शेड येथे दर्शन रांगेतील भाविकांना आरोग्याची तपासणी केली जात होती. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी लाभ घेतला घेतल्याचे दिसत होते. सध्या तीन क्रमांकाचा पात्राशेड भाविकांनी भरला असून चैत्र-यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत दाखल झाला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले.