ईतर

चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या दोन तरुण वारकऱ्यांचा बुडून मृत्यू

नागपूर येथील दोन तरुण पंढरपूर येथे दर्शनासाठी आले असता घडली घटना

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आधी चंद्रभागा स्नान मग विठ्ठल दर्शन या संतांच्या ओवीप्रमाणे येणारा प्रत्येक भाविका प्रथम चंद्रभागेत स्नान करून मगच विठ्ठल दर्शनाला जात असतो मात्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेलेल्या तीन पैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झालाने हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. हे दोन्ही तरुण नागपूर येथील भाविका असल्याची माहिती समोर येते

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी नागपूर येथील तीन युवक वारकरी हे चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नानासाठी गेले दरम्यान दोघेजण नानाला गेले व एक जण नदीपात्रा बाहेर सामानाकडे लक्ष देण्यासाठी थांबला होता थोड्याच वेळात दोघेही बुडत असल्याने नदीकाठावर बसलेल्या मित्राने आरडाओरड सुरू केला.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी नागपूर येथून आलेल्या तिघांपैकी दोन तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेने नदी परीसरात हळहळ व्यक्त होत होती.
दोन्ही युवक नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याचे होते. मयता मध्ये सचिन शिवाजी कुंभारे (वय २८, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार (वय २७, रा. नारसिंगी) असे मृत दोन वारकरी तरुणांची नावे आहेत.

जलालखेडा व नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करावी व नंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे त्यांनी ठरवले. सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला. परंतु नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. जीव वाचवण्यासाठी दोघांनी अर्ध ओरडा सुरू केला तेव्हा बाहेर सामानाकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यातील थांबलेल्या तरुणाला त्यांचे आवाज ऐकू येत असते आणि वाचवण्यासाठी मदतीसाठी ओरडू लागला. तेथे उपस्थित असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी त्यांना बाहेर काढले परंतु दोघांचा मृत्यू झाल्याचे समजतात परिसरात भाविकांनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून भाविकांना आवाहन करण्यात आले की नदीपात्रात पाण्याचा अंदाज येत नसल्याने भाविकांनी पात्राच्या मध्ये जाऊ नये नदी काठावरच बसून आंघोळ करावी व देवदर्शनाला जावे असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close