ईतर

छ.संभाजीनगर मध्ये चंदुकाका सराफांच्या सुवर्ण दालनाचा शुभारंभ

१ बीएचके फ्लॅट, स्कूटर, लॅपटॉप,मोबाईल आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांना संधी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

छ.संभाजीनगर मध्ये चंदुकाका सराफांच्या सुवर्ण दालनाचा शुभारंभ

१ बीएचके फ्लॅट, स्कूटर, लॅपटॉप,मोबाईल आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांना संधी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- छत्रपती संभाजीनगरकरांच्या अनेक दिवसाच्या मागणीनंतर अखेर बारामती येथील नामवंत व सराफ पिढीची परंपरा लाभलेले चंदूकाका सराफ यांच्या चंदूकाका ज्वेलर्स या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.

सन १८२७ पासून सोने चांदीची परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता, नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांच्या सुवर्ण दालनाचा भव्य शानदार शुभारंभ महाराष्‍ट्राचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री अतुल सावे व चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे संचालक अतुल जिनदत्त शहा, सौ.संगीता अतुल शहा यांच्या हस्ते तसेच सिध्दार्थ अतुल शहा, सौ.डॉ अंकिता शहा,आदित्य अतुल शहा, सौ.स्वीटी बागी, साहस बागी, डॉ. राजेश फडे, डॉ.विवेक देशमुख, वसंतराव देशमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जालना रोड, सिडको, एन ३, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सकाळ पासूनच संभाजीनगरकरांनी दागिने खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

यावेळी बोलताना ना.अतुल सावे यांनी चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे छ. संभाजीनगर शहरात त्यांची शाखा सुरू केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. यामुळे छ.संभाजीनगर शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी सर्व मान्यवरांचा सत्कार चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्या वतीने अतुल शहा, सिध्दार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा यांनी केला.

उद्‌घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांनी दिनांक ३ ऑक्‍टोबर ते ११ ऑक्‍टोबर या कालावधीत अनेक ऑफर्स उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये रुपये १९,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक आकर्षक बक्षिसे मिळवण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यामध्ये १ बीएचके फ्लॅट, स्कूटर, लॅपटॉप, मोबाईल जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून सोबत ३००० रुपयांच्या पुढील योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.

यावेळी बोलताना अतुल शहा म्हणाले की कृषी आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या व ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या छ.संभाजीनगर शहरात सुरू होत असलेली चंदुकाका सराफ ज्वेलर्सची ही चौदावी शाखा आहे. शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणार्‍या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्‍या विश्‍वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल केली आहे. ग्राहकांच्या याच पाठिंब्यामुळे आज छ. संभाजीनगर शहरात चंदुकाका सराफ ज्वेलर्सची शाखा सुरू होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

या विशेष उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त छत्रपती संभाजीनगरकरांनी घेवून दागिने खरेदी सोबतच आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन संचालक सिद्धार्थ शहा यांनी केले आहे. याशुभप्रसंगी जय किशन शिक्षण संस्था बालिकाश्रमाला आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close