चिंचणी पर्यटन क्षेत्राला औद्योगिकरणा प्रमाणे विकसित करणे गरजेचे -गजानन गुरव
चिंचणी गांव एक मॉडेल व पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येईल
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : निसर्ग ग्रामीण कृषी किंवा धार्मिक पर्यटनाला औद्योगिक क्षेत्राप्रमाणे सुविधा देणे आवश्यक असून त्याचा स्वतंत्र इंडस्ट्री म्हणून विकास केल्यास धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना जादाच्या सुविधा मिळून त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागाचे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त चिंचणी येथे आयोजित पर्यटन गप्पागोष्टी या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की पंढरपूर तीर्थक्षेत्र व धार्मिक पर्यटनासाठी म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची,भाविकांची संख्या भरपूर आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची उपलब्धता आहे फक्त त्या लोकांना आम्ही पंढरपूरच्या परिसरात असणाऱ्या अनेक पुरातन मंदिर ग्रामीण वस्तू ,खाद्यपदार्थ असतील याची वेगळी माहीत देऊ शकलो. त्यांना चिंचणी सारख्या गावांमध्ये जर आणू शकलो तर त्या ठिकाणच्या स्थानिकांना शेतीच्या बरोबरीने रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांना सुद्धा आनंद मिळणार आहे.
यावेळी डी.वाय.एस.पी विक्रम कदम आय.पी.एस अधिकारी राहुल चव्हाण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच चिंचणी ग्रामीण पर्यटन केंद्रामध्ये आलेले अनेक पर्यटक उपस्थित होते. यावेळी अजय डडू या पर्यटकाचा प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डी.वाय.एस.पी विक्रम कदम म्हणाले की पंढरपूरला येणाऱ्या बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चिंचणी ला जाण्याचे पहिले प्राधान्य असते अशावेळी चिंचणी लोकसहभागातून एक मॉडेल गाव व पर्यटन केंद्र म्हणून उभे राहत आहे. ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. यावेळी पुणे ग्रामीण विभागाचे डी.सी.पी मितेश घट्टे यांनी जि. प .शाळा चिंचणीस एक संगणक संच भेट दिला आहे. त्याचा लोकार्पण कार्यक्रम ही शाळेमध्ये घेण्यात आला. तसेच विक्रम कदम यांच्या हस्ते स्थानिक प्रजाती असणारे पिंपरण हे झाड लावण्यात आले. यावेळी संबंधित मान्यवरांनी चिंचणी पर्यटन केंद्राची पाहणी केली तसेच येथील ग्रामीण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहन अनपट यांनी केले तर सूत्रसंचालन शशिकांत सावंत यांनी केले. आभार समाधान गाजरे यांनी मानले. यावेळी चिंचणी गावासह अनेक पर्यटक यामध्ये सहभागी झाले होते.