नरखेड येथील अपहरण प्रकरणी मोहोळ पोलिसांनी ७ तासात केले तीन आरोपी जेरबंद
नरखेड येथून रात्रीतून दोघांना केले होते अपहरण मोहोळ पोलिसांची कार्य तत्परतेने दोघांची सुटका ३ आरोपी जेरबंद
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
राजेश शिंदे: मोहोळ–
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथुन दोघांना दूध डेरीच्या पैशाच्या वादातून इंदापूर नेचर दूध डेअरीच्या आठ ते दहा व्यक्तींनी इंदापूर येथे उचलून नेऊन डांबून ठेवल्याची घटना २१ डिसेंबर रोजी साडेबारा वाजता घडली होती त्यांच्या खिशातून मोबाईल व रोख रक्कम ५० हजार रुपये काढून घेतल्या प्रकरणी सहा व्यक्तींवर २२ डिसेंबर रोजी रात्री उशीरा मोहोळ पोलिसात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल होताच मोहोळ पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीसांची एक टीम इंदापूर जि. पुणे येथे पाठवून संबंधित अपहरणातील दोघांची सुटका करून अवघ्या ७ तासांमध्ये श्रीकांत शिवाजी खरात रा. लासूर्णो ता . इंदापूर , सुनील मधुकर मदणे रा . बेलवाडी ( ता . इंदापूर ) इमाम अब्दुलगणी शेख रा.बेलवाडी ता.इंदापूर या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. नरखेड येथील राऊत यांनी दिलेली फिर्याद या मधिल पकडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ७ तासांमध्ये तीन आरोपींना इंदापूर तालुक्यातून घेतले ताब्यात सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, शरद ढावरे,अमोल घोळवे , गणेश दळवी , सिद्धेश्वर मोरे , हरिदास थोरात यांनी केली.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली अशा अनेक गुन्ह्याचा उलगडा काही तासांमध्येच करून आरोपींना मोहोळ पोलिसांनी जेरबंद केल्याने पोलीस निरीक्षक अशोक सायकर आणि टीमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com