माझी पालकमंत्री देशमुख यांना धमकी देणाऱ्या वर कडक कारवाई करावी- म्हमाणे
शहर भाजपच्या वतीने पंढरपूर पोलिसांना दिले निवेदन
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तर चे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना पी एफ आय च्या कार्यकर्त्याने जीवे ठार मारण्याच्या धमकीचे पत्र दिले होते. यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून संबंधित तरुणाला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने होऊ लागली आहे. पंढरपुरातही शहर भाजपच्या वतीने संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तर चे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना पत्राद्वारे धमकी देणारा पीएफआय चा कार्यकर्ता मोहम्मद इनामदार याच्यावर कडक कारवाई करून याच्या पाठीमागील सूत्रधार कोण आहेत ? याचा योग्य ते तपास करून कारवाई करावी अशी मागणी
पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली. व तसे निवेदन ही आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
याप्रसंगी धिरज म्हमाने , संदीप माने , बादल सिंह ठाकुर , भैय्या कळसे, सुभाष मस्के, माऊली हळणवर ,आदेश कांबळे , संजय पालकर , नितीन करंडे, बालाजी वाघमारे, सुनील आधटराव , नागेश लिगाडे , दीनदयाळ लिगाडे , शंकर वायचळ , बंटी वाघ, प्रवीण पिसाळ, राजेश सावंत, नितीन गांधी इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.