कोरोनाबाधितांच्या संख्येत होतीय वाढ मात्र एक मोठा दिलासा मिळणार आहे
येत्या काही दिवसात राज्यातील रुग्ण संख्या पंधरा हजारावर पोहोचण्याची शक्यता कोणी वर्तवली पहा

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मुंबई : देशभरासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या संख्येमुळे आरोग्य प्रशासनाचं टेन्शनही वाढत आहे. शनिवारी राज्यात तब्बल ९ हजार १७० नवीन रूग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे आता आरोग्य विभागाने टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
दरम्यान राज्यात शनिवारी दिवसभरात ६ ओमायक्रॉन बाधित देखील आढळले आहेत. नव्याने आढळून आलेल्या या ६ रुग्णांमध्ये पुणे ग्रामीणमध्ये ३, पिंपरी-चिंचवडमध्ये २ तर पुणे महापालिका हद्दीत एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या आता ४६० वर जाऊन पोहचली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण वाढत आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत मुंबई नवे ९१९ रुग्ण वाढले आहेत
मात्र एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची वाढ होत असली तरीही, घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण ५ हजार ७१२ रुग्णांमध्ये लक्षणं आढळली नाहीत. दिलासादाक बाब म्हणजे दिवसभरात फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तूर्तास लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जनतेला दिलासा दिला आहे. राज्यात तुर्तास लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १५ हजारावर पोहचेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com