सामाजिक

कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी-पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

सोलापूर : गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रूग्णसंख्या कमी होती, मात्र सध्या राज्याबरोबर जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर महाराजांचे पालकमंत्री श्री. भरणे यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी श्री. भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार घालण्यात आलेल्या अटीनुसार गुरूवारी पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सुरेश घुले, संतोष पवार, किसन जाधव, तौफिक शेख यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, मानकरी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे, असा आशीर्वाद मागितला आहे. अजून कोरोनाचे संकट संपले नाही. नागरिकांनी गाफिल न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वत:ची काळजी घ्यावी. 15 वर्षांपुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. शासकीय नियमाचे पालन करा.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

पालकमंत्री श्री. भरणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्तही भाविकांना शुभेच्छा दिल्या.

कोविड वॉर्डमधील रूग्णांची केली विचारपूस

पालकमंत्री श्री. भरणे यांनी आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील कोविड वॉर्डची पाहणी केली. तब्बेत कशी आहे. त्रास काय काय होतोय, आता बरे वाटतंय,सोयीसुविधा मिळतात का,याची माहिती पालकमंत्र्यांनी स्वत: रूग्णांकडून विचारून घेतली. त्रास जास्त जाणवत नाही, खोकला, सर्दी अशी सौम्य लक्षण असल्याचे रूग्णांनी सांगितले. वैयक्तिकरित्या पालकमंत्र्यांनी कोरोना वॉर्डात जावून रूग्णांची विचारपूस केली. या वॉर्डात एकूण 56 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असून यातील 36 रूग्ण हे वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहेत.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक दिनेश खंडेलवाल, पंढरपूर
mail -lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close