ईतरसामाजिक

दिल्लीत शरद पवारांची विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली भेट

आमदार अभिजीत पाटील यांच्या अभ्यासपूर्ण कामाचे शरद पवारांनी केले कौतुक

संपादक – दिनेश खंडेलवाल 

दिल्लीत शरद पवारांची विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली भेट

आमदार अभिजीत पाटील यांच्या अभ्यासपूर्ण कामाचे शरद पवारांनी केले कौतुक

पंढरपूर(प्रतिनिधी):- देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. शरदचंद्र पवार यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगणीक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ऊस, केळी, द्राक्षे, डाळिंब,केळी चे एआय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क करून मतदारसंघातील करत असलेल्या कामांविषयी तोंडभरून कौतुक केले. अधिवेशनामध्ये अभ्यासपुर्ण प्रश्न उपस्थित करत आहेत यांची देखील नोंद पवार यांनी घेतली आहे. यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले.

दरम्यान शेतीमध्ये नवनवीन प्रयोग वापरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. आंतर पिकाबरोबरच फळबागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो असेही खासदार शरद पवार यांनी सांगितले. दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी आपल्या शेतीची आवड जोपासत आधुनिक तंत्रज्ञानात शेतीची माहिती सर्वांना करून दिली.

यावेळी दिनकर चव्हाण, संभाजी भोसले, दशरथ जाधव, सुरेश भुसे, अशोक तोंडले, अशोक घाडगे, सिताराम गवळी, कालिदास साळुंखे, दत्तात्रय नरसाळे, नवनाथ नाईकनवरे, धनंजय काळे, साहेबराव नागणे, बाळासाहेब हाके, जनक भोसले, सिद्धेश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे, प्रवीण कोळेकर, सचिन वाघाटे, सचिन पाटील, तानाजी बागल, समाधान गाजरे, महेश खटके, गणेश ननवरे, उमेश मोरे, धनाजी खरात तसेच धाराशिवचे संचालक संतोष कांबळे, भागवत चौगुले, सुरेश सावंत, संदीप खारे, संजय खरात, सुहास शिंदे यांनी भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close