लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : डॉक्टर शीतल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये बालकांच्या हृदयरोग निदान व उपचार शिबीर यामध्ये सुमारे 150 बालकांची तपासणी करण्यात आली यामध्ये ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा बालकांवर विना टाके लेझर द्वारे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर शीतल शहा यांनी दिली.
पंढरपूर शहरातील लहान बालकांच्या विविध आजारावर योग्य उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे लहान मुलांचे विविध आजार यामध्ये बाळ निळसर पडणे,वजन वाढणे,जोरजोरात श्वास चालणे,दूध व्यवस्थित न पिणे,दूध पिताना कपाळावर घाम येणे,वारंवार निमोनिया होणे त्याचबरोबर नेहमी आढळणारे एएसडी,पीडीए, व्हीएसडी अशा आजाराची लक्षणे दिसून येत असलेल्या बालकांची तपासणी व निदान करण्यात आले.
बाळाला जन्मताच हृदयाचे असलेले छिद्र,ओपन हार्ट शस्त्रक्रिया न करता डिवाइस तंत्राद्वारे कायमचे बंद केले जाते तेही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत असलेल्या सुविद्या मध्ये या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात.
या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली.
एक दिवसाचे शिबिर राबविण्यात आले.
यासाठी नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व कमल कांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने हृदयाची टू डी इको सोनोग्राफी, अद्ययावत मशिनद्वारे व तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
यासाठी डॉ. शितल के शहा,डॉ. संतोष जोशी, डॉ. सुनील पटवा,डॉ. सुधीर आसबे,डॉ. विनायक उत्पात,डॉ. रविराज भोसले आदींच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. अशी माहिती डॉक्टर शितल के शहा यांनी दिली.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com