ईतरसामाजिक

पंढरपुर तालुक्यातील हजारों एकर डाळिंब व द्राक्षबागांना अवकाळीचा फटका

अवकाळी पावसाच्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : बदलत्या हवामानामुळे पडणाऱ्या अवकाळी पावसाने पंढरपूर तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहीलीच नुकसान भरपाईची मदत मिळत नाही तोपर्यंत अवकाळीचा पुन्हा तडाखा बसल्याने आता शेतकरी चिंतातुर झाला आहे.
मध्यरात्रीपासून पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा द्राक्ष ,डाळिंब बागांसह मका,कांदा,तूर,सोयाबीन, आदि रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. सतत धार पडणाऱ्या पावसाने पंढरपूर तालुक्‍यातील सुमारे 8 ते 10 हजार एकरावरील द्राक्षबागा धोक्‍यात आल्या आहेत. तर डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मोडले आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू यासह अन्य फळबागा व रब्बी पिका सह भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. यावरही मात करत डाळिंब व द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मध्यरात्री पासून अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे कांदा तूर मका सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सलग आठ तासाहून अधिक काळ पाऊस सुरू असल्याने डाळिंब व द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्‍यात सुमारे ८ ते १० हजार एकरावर द्राक्षबागा आहेत तर सुमारे १० ते १२ हजार एकरावर डाळिंबाचे पीक आहे. संततधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरल्याने कुजवा आणि दावण्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तर अनेक ठिकाणी द्राक्षावरील फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्यातील विविध भागातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व फळबागा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शासनाने करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close