क्राइम

पंढरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा? केमीकल लिक्वीड सापडल्याने अनेकांचे दणाणले ढाबे!

दुधात भेसळ करण्याचे लिक्विड आणि वाहणांसह तिघांना घेतले ग्रामीण पोलिसांनी ताब्यात

संपादक दिनेश खंडेलवाल

पंढरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा? केमीकल लिक्वीड सापडल्याने अनेकांचे दणाणले ढाबे!

दुधात भेसळ करण्याचे लिक्विड आणि वाहणांसह तीघांना घेतले ग्रामीण पोलिसांनी ताब्यात 

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यांमध्ये भेसळयुक्त दूध बनवण्याचे व विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दुधामध्ये भेसळ करण्याकरिता लागणारे केमिकल लिक्विड सह दोन वाहने ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांचे ढाबे दणाणले असून त्यासाठी लागणारे केमिकल लिक्विड सामानासह दोन वाहने ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी पो. हवालदार नवनाथ सावंत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हे पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टाटा इंट्रा व अशोक लेलँड अशी दोन संशयित वाहने नवीन वाखरी-गुरसाळे बायपास फ्लाई ओव्हर पुलाजवळ दिसून आली.

त्यामधील टाटा इंट्रा टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे १९ कॅन व दुसऱ्या अशोक लेलँड टेम्पोमध्ये निळ्या रंगाचे प्लास्टिकचे १४ कॅन त्या मध्ये पांढऱ्या रंगांचे लिक्विड भरलेले दिसून आले. त्यावेळी टेम्पो जवळ असणारे तीन तरुण १) निलेश बाळासाहेब भोईटे वय ३० वर्ष रा. रो हाऊस क्रमांक ३८, वृंदावनम सोसायटी, टाकळी. २) परमेश्वर सिद्धेश्वर काळे वय ४० वर्ष रा. काळे मळा, फुलचिंचोली. ३) गणेश हनुमंत गाडेकर वय २५ वर्ष रा. सुरेंद्र कुलकर्णी यांचे घरी, गणेश नर्सरी जवळ, टाकळी रोड, पद्मावती, पंढरपूर हे तिघे आढळून आले.

सदर प्रकारा बाबत तिघांकडे दुधाचे रिकामे कॅन व प्लास्टिकच्या कॅनमध्ये असलेले पांढरे लिक्विड याबाबत सखोल चौकशी केली असता सदरचे लिक्विड सुमित मेहता रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती यांचेकडून दुधात भेसळ करण्याकरता आणलेले आहे असे सांगितलेले आहे.

सदर घटने बाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले असून त्या विभागाचे पथक पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे आले असून त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. संबंधित आरोपी बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

पंढरपूर तालुक्यांमध्ये यापूर्वीही भेसळयुक्त दुधाचा काळाबाजार अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी आणि पोलिस प्रशासनांनी मिळून बाहेर काढला होता. परंतु आरोपींना भेसळयुक्त दुध करण्याची चटक लागल्यामुळे असे प्रकार पुन्हा वारंवार होताना दिसून येत आहे. नुकतेच भेसळयुक्त दुधासाठी लागणारे केमिकल लिक्विड पकडल्याने तीर्थक्षेत्र पंढरीमध्ये विक्री होणाऱ्या लाखो लिटर दुधाकडेही संशयितरित्या बघितले जाऊ लागले आहे.? यामुळे आता अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी दूध विक्रीच्या ठिकाणीही भेसळयुक्त दुधाची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close