अतुल खूपसे-पाटील यांच्यासह २३ जणांवर या पोलीस स्टेशन मध्ये झाला गुन्हा दखल
लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनात 'जनशक्ती'ने दिला होता पाठिंबा

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मुंबई : राज्यातील मातंग समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जाती करता एकत्रित असलेल्या १३ टक्के आरक्षणाची व अनुसूचित जातीसाठी असलेल्या सर्व योजनांची अबकड नुसार वर्गवारी करण्यात यावी. मातंग समाजाच्या या महत्त्वपूर्ण मागणीसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तात्काळ स्थापन करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबई मंत्रालयाच्या समोर मंत्रालयाची ओटी भरून व पूर्ण नग्न आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी जनशक्ती संघटनेने पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्याने अतुल खूपसे पाटील यांच्यासह २३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जनशक्ती संघटनेने आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्याने संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबाराजे कोळेकर, रोहन नाईकनवरे, तेजस बलाल, भरती कांबळे, फुलताई थोरात, रोहित कलसे, सागर कसबे, संतोष आहिरे, सचिन क्षीरसागर, संतोष मोरे, कुर्शना गळफाडे, गौरव गवळी, गजानन सोनवणे, पिरतेश गवले, अर्जुन धाकतोडे, सचिन खंदारे, राहुल पिसोले, संतोष निकाळजे, अविनाश खाडेकर, विजय गायकवाड, सचिन साबळे या २३ लोकांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीत गैर कायद्याची मंडळी एकत्र जमवून पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून राज्य शासनाच्या कोवीड नियमावलीचा भंग केल्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद ३९६/२०२१ कलम ३५३, १८८, २६९, १४१, १४३, १४५ भा.द.वि. सह ५१ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com